आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मेरी कोम' : बॉक्स ऑफिसच्या रिंगणात प्रियांकाचा पंच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्यात प्रियांका चोप्रा स्टारर 'मेरी कोम' हा सिनेमा प्रदर्शित झाला. व्हायकॉम 18 आणि संजय लीला भन्साळी यांची संयुक्त निर्मिती असलेल्या या सिनेमाचे एकुण बजेट 30 कोटींच्या घरात आहे. प्रिंट आणि प्रचारासह या सिनेमाचा एकुण खर्च 45 कोटी रुपये आहे.
निर्मात्यांनी या सिनेमाचे भारतातील वितरणाचे हक्क एसटीव्ही नेटवर्क कंपनीला 26 कोटींमध्ये विकले आहेत. याशिवाय संगीत आणि सॅटेलाइट टीव्ही हक्कांची विक्रीसुद्धा चांगल्या किंमतीत झाली आहे. त्यामुळे रिलीजपूर्वीच निर्माते आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहेत.
भारतात 55 कोटींच्या ग्रॉस व्यवसायातून वितरकांचा खर्च वसूल होणार आहे. रिलीजपूर्वीच हा सिनेमा बराच चर्चेत आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हा सिनेमा करमुक्त कऱण्यात आला आहे. याचा फायदा नक्कीच सिनेमाला होणार आहे.
प्रियांका चोप्राच्या करिअरमधील हा महत्त्वाचा सिनेमा आहे. 'मेरी कोम'च्या मोठ्या यशामुळे तिच्या करिअरची दिशा बदलू शकते. दशकापूर्वी एखाद्या बॉक्सर महिलेच्या जीवनावर सिनेमा बनवण्याचा विचार कदाचित कुणी केला असावा. आज भव्य स्वरुपात हा सिनेमा रिलीज होतोय. सिनेमाच्या विकासाच्या दिशेत नक्कीच हे एक कौतुकास्पद पाऊल आहे.