आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maunraag Film Completed Based On Mahesh Elkunchawar's Literature

महेश एलकुंचवार यांच्या साहित्यकृतींवर आधारित ‘मौनराग’ हा चित्रपट पूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या साहित्यकृतींवर आधारित ‘मौनराग’ हा चित्रपट पूर्ण झाला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पर्धात्मक विभागासाठी या चित्रपटाची निवड झाली आहे. एका ज्येष्ठ लेखकाच्या कलाकृतींचे कलात्मक आकलन करणारा हा चित्रपट अपवाद ठरणार आहे.


मराठीतील अनेक साहित्यिकांच्या कलाकृतीवर याआधी माहितीपट, लघुपट तयार करण्यात आले आहेत. पण ‘मौनराग’ रंगभूमीचे जग (नट आणि तालमी) वापरून तयार केलेला चित्रपट आहे. यामध्ये एका नाटककाराची गोष्ट सांगितली असल्याचे दिग्दर्शक वैभव आबनावेने सांगितले. हा चित्रपट म्हणजे एलकुंचवारांच्या समग्र कार्याचा चित्रमय प्रवास आहे. आनंद चाबुकस्वार, धर्मकीर्ती सुमंत यांच्यासह मी स्वत: एलकुंचवारांचे गुंतागुंतीचे कल्पित जग स्वतंत्र संहितेत बांधण्याचा प्रयत्न केल्याचेही वैभव म्हणाला.


माधुरी पुरंदरे, गजानन परांजपे, अश्विनी गिरी, शशांक शेंडे आणि बालकलाकार देवाशिष परांजपे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. निर्मिती अश्विनी परांजपे प्रॉडक्शन्स आणि फास्ट अँड फिक्शन फिल्म्सची आहे.
मराठी नाट्य-साहित्य इतिहासात झालेले प्रयोग समजून घेऊन त्याचा एक सांस्कृतिक दस्तऐवज करण्याची व सृजनाच्या चैतन्यमय प्रक्रियेचा शोध घेण्याची विनम्र सुरुवात म्हणजे हा चित्रपट असल्याची भावना चित्रपटाच्या चमूने व्यक्त केली आहे.


समाजाशी असलेले नाते उलगडणार
नऊ ऑक्टोबरला महेश एलकुंचवार 74 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने हा चित्रपट पूर्ण केला आहे. आत्ममग्नतेच्या तळाशी जाऊन एका कलाकाराचे समाजाशी नाते समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे.
वैभव आबनावे, दिग्दर्शक