आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PIX: अनूप जलोटा यांच्या पत्नीच्या बर्थडे पार्टीत पोहोचले बॉलिवूडमधील गायक-दिग्दर्शक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अनूप जलोटा यांना केक भरवताना पत्नी मेधा, सोबत मुलगा आर्यमान (ब्लू शर्ट))
मुंबई - गायक अनूप जलोटा यांची पत्नी मेधा जलोटा यांनी 25 जून रोजी आपला वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने अनूप यांनी मुंबईतील सोफिटेल हॉटेल बीकेसीमध्ये एक शानदार पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत इंडस्ट्रीतील गायक, दिग्दर्शकांसह अनेक सेलेब्स सहभागी झाले होते.
अभिनेता कबीर बेदी पत्नी परवीन दुसांजसह पार्टीत सहभागी झाली होती. गायक हरिहरन, अभिनेत्री इला अरुन, अभिनेत्री अनिता कंवल, चॉकलेट मेकर्स जेबा कोहली, अभिनेत्री तन्वी आझमी, संगीतकार लेस्ली लेविस यांनीही पार्टीत हजेरी लावून मेधा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या सर्वांसह गायक पंकज उदास पत्नी फरीदासह तर गायकल तलत अजीज पत्नी बीनासह पार्टीत सामील झाले होते. दिग्दर्शक रमेश सिप्पींनीही सहपत्नी मेधा यांना शुभेच्छा दिल्या.
बर्थ डे पार्टीत अनूप यांचा मुलगा आर्यमनसुद्धा हजर होते. मेधा यांच्यासाठी खास बर्थ डे केक मागवण्यात आला होता. पार्टीला ट्रेडिशनल टच देण्यात आला होता. तबला, बासरी वादन यावेळी करण्यात आले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अनूप जलोटा यांच्या पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...