आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Amitabh Bachchan Celebrated Birthday With Media And Fans

बिग बींनी मीडिया आणि चाहत्यांसोबत साजरा केला B\'day, आराध्याचे गिफ्ट असेल स्पेशल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आज आपल्या मुंबईतील जनक बंगल्यात आपला 72 वा वाढदिवस साजरा केला. मीडिया आणि चाहत्यांसोबत त्यांनी हे सेलिब्रेशन केले. यावेळी अमिताभ यांनी मीडियासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. (शांतता नोबेलसाठी बिग बींनी दिल्या सत्यार्थी आणि मलाला यांना शुभेच्छा)
या इव्हेंटमध्ये बिग बींना पोहोचायला थोडा उशीरा झाला होता. आईवडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रतीक्षा बंगल्यावर गेलो होतो, त्यामुळे येथे पोहोचायला उशीरा झाल्याचे त्यांनी सांगितले. बिग बी पुढे म्हणाले, की दररोजप्रमाणेच हा दिवस आहे. घरातील सर्व महिलांना आज उपवास आहे. रात्री चंद्र बघितल्यानंतर त्यांचा उपवास सुटेल. काही स्पेश प्लान नाहीयेत. मात्र संपूर्ण दिवस घरच्यांसोबत घालवणार आहे.
आजच्या दिवसाचे स्पेशल गिफ्ट कोणते? असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, आराध्या अद्याप झोपेतून उठलेली नाही. ती उठल्यानंतर तिच्यासोबत वेळ घालवले. ती काय गिफ्ट देणार याची उत्सुकता आहे. तिने दिलेले गिफ्टच स्पेशल गिफ्ट असेल.
बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने त्यांचे चाहते येथे आले होते. बिग बींसाठी एक खास केकसुद्धा त्यांनी आणला होता. बिग बींनी केक कापून मीडिया आणि चाहत्यांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी बिग बींनी अबू-संदीप यांनी डिझाइन केलेला कुर्ता-पायजामा परिधान केला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा आज क्लिक झालेली बिग बींची खास छायाचित्रे...