वानखेडे परिसरात बीसीसीआयच्या कार्यालयामध्ये जबाब नोंदवण्यासाठी आलेली प्रिती झिंटाला घेऊन जाताना पोलिस
मुंबई: प्रिती झिंटाने एक्स बॉयफ्रेंड नेस वाडियाच्या विरोधात जबाब नोंदवला आहे. मंगळवारी (24 जून) वानखेडे स्टेडिअममध्ये पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला. ती संध्याकाळी 5:45 वाजता पाली हिल परिसरातील घरातून वानखेडे स्टेडिअमकडे निघाली आणि जवळपास 7 वाजता तिथे पोलिस पोहोचले.
सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे, जवळपास तीन तास पोलिसांसोबत चाललेल्या बातचीतदरम्यान तिने सांगितले, 'जेव्हा माझा आणि वाडियाचा वाद चालू होता तेव्हा जिनसुध्दा तिथे उपस्थित होता. तेव्हा जिनने माझी साथ दिली. पोलिसांनी या घटनेचे साक्षी आणावेत आणि केस सोडवावी.'
वानखेडे स्टेडिअममध्ये प्रितीसोबत घडलेल्या घटनेच्या विरोधात 30 मे रोजी छेडछेडा प्रकरणाची तक्रार दाखल केली होती. प्रितीचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिस प्रतकरणात वाडियाचासुध्दा जबाब नोंदण्यासाठी बोलवण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आतापर्यंत आयपीएलचे सीओओ सुंदर रमन आणि बीबीसीआय सचिव संजय पटेलसह सात लोकांचे जबाब नोंदवले आहे.
प्रितीच्या घराबाहेर माध्यमांची गर्दी
मुंबई स्थित प्रिती झिंटाच्या घरा बाहेर सकाळी माझ्यमांची गर्दी दिसून आली. प्रितीची घराबाहेर येण्याची माध्यमांना प्रतिक्षा होती. नेस वाडियावर छेडछाडीचा आरोप केल्यानंतर आणि तक्रार दाखल केल्यानंतर प्रिती आतापर्यंत माध्यमांसमोर आली नव्हती.
काय आहे प्रकरण?
प्रिती झिंटा एक्स बॉयफ्रेंड नेस वाडियाच्या विरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केल्यानंतर अमेरिकेला रवाना झाली होती. प्रितीचा आरोप आहे, की आयपीएल सामन्यादरम्यान नेसने तिला शिवीगाळ करून अपमानित केले. 12 जून रोजी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर प्रिती माध्यमांसमोर आली नव्हती. कारण ती त्यानंतर सरळ अमेरिकेला रवाना झाली होती. रविवारी (22 जून) ती अमेरिकेहून परतली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा वानखेडे स्टेडिअमवर पोहोचलेल्या प्रितीची काही छायाचित्रे...