एकता कपूर आणि बेजॉय नामबिआर यांच्या 'कुकू माथुर की झंड हो गई' सिनेमाचे स्टार्स काल (4 मे) पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. यावेळी मुख्य कलाकार सिध्दार्थ गुप्ता, सिमरन कौर आणि पल्लवी बत्राने माध्यमांना आपल्या सिनेमाचा परिचय करून दिला. यावेळी स्टार्सव्यतिरिक्त प्रसिध्द संगीतकार अनु मलिक त्यांची मुलगी अनमोल मलिकसह अनेक सेलिब्रिटी स्टेजवर पोहोचले होते.
'कुकू माथुर की झंड हो गई' हा एक कॉमेडी सिनेमा असून मन सचदेवने त्याला दिग्दर्शित केले आहे. सिनेमाची कहानी एक तरुणाच्या भोवती गुंफलेली आहे. त्याला आपल्या 'कुकू' नावाने अपमानित व्हावे लागते. या सिनेमात अनु मलिक यांनी एक गाणे आपल्या आवाजात स्वरबध्द केले आहे. एकताच्या सांगण्यानुसार, हा एक वेगळ्या थाटणीचा कॉमेडी सिनेमा आहे. यातून प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन होईल अशी आशा आहे. 30 मे रोजी हा सिनेमा सर्व थिएटरमध्ये झळकणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून तुम्ही बघू शकता या मिडीया इंटरॅक्शनची काही छायाचित्रे...