आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: 17व्या वर्षीच मिस इंडिया बनली होती बॉलिवूडची 'दामिनी', पाहा कुटुंबीयासोबतचे Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुलगी केंदा, पती हरीश, मुलगा जोशसोबत मीनाक्षी शेषाद्री)
मीनाक्षी शेषाद्रीच्या वाढदिवसानिमित्त Divyamarathi.com तिच्या कुटुंबाविषयी सांगत आहे.
रांची- विविध शहर, राज्य, देशांतून बॉलिवूड नशीब आजमवण्यासाठी तरुण-तरुणी येत असतात. बॉलिवूड यातील काहींना त्यांचे ध्येय मिळवून देते तर काहींना अपयश घेऊन परतावे लागते.
1980मध्ये झारखंडने बॉलिवूडच्या अशाच एका तरुणीला प्रसिध्दी मिळवून दिली. तिने बॉलिवूडसह झारखंडचेही नाव उंचावले. आम्ही सांगत आहोत मीनाक्षी शेषांद्रीविषयी. एकेकाळी ती आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये सामील होती. कमी वयातच तिने मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला होता. बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करून तिने नवीन ओळख तयार केली. गेल्या काही वर्षांमध्ये ती बॉलिवूडच्या लाइमलाइटपासून दूर आहे.
मीनाक्षीचा जन्म 16 नोव्हेंबर 1963मध्ये झारखंडच्या सिंदरीमध्ये झाला. तामिळ कुटुंबात झालेल्या या अभिनेत्रीला भरतनाट्यमपासून ते कत्थकपर्यंत चार नृत्यप्रकार येतात. मीनाक्षीने वयाच्या 17व्या मिस इंडियाचा किताब जिंकला होता. त्यानंतर बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. दामिनीसारखे हिट सिनेमे तिने बॉलिवूडमध्ये केले. मात्र एका विशिष्ट वेळेनंतर तिने बॉलिवूडला अलविदा म्हटले.
बॉलिवूडमधून दूर झाल्यानंतर मीनाक्षी ने हरीश मैसूर नावाच्या एका बँकरसोबत लग्न केले. हे लग्न न्यूयॉर्कमध्ये रजिस्टर करण्यात आले आहे. मीनाक्षी आणि हरीश यांना मुलगी केंद्रा आणि मुलगा जोश अशी दोन मुले आहेत. मीनाक्षी डान्स क्लाससुध्दा चालवते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कुटुंबीयांसोबतची मीनाक्षीची छायाचित्रे....