आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Aamir\'s Daughter, Not Only Style Even In Studies The First

PICS: भेटा आमिरच्या लाडक्या लेकीला, फक्त स्टाइलच नव्हे तर अभ्यासातही आहे हुश्शार...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिर खान इंडस्ट्रीमधील सर्वात नशीबवान वडीलांपैकी एक आहे असेच म्हणावे लागेल. कारण मुलगी इराने आमिरचे नाव उंचावले आहे.
इंडस्ट्रीमध्ये सर्व स्टार्सचे मुले आपल्या आई-वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून चालण्याचे स्वप्न बघत असतात. परंतु आमिरच्या लाडक्या लेकीने जरा हटके काम केले आहे. इराने शालेय परिक्षेत 89% गुण घेऊन सिध्द केले आहे, की अभ्यासाची जागा आणि स्टारडमची जागा वेग-वेगळी आहे.
इरा आमिर आणि त्याची माजी पत्नी रीना दत्त यांची मुलगी आहे. 1986मध्ये रीना दत्तसह लग्नागाठीत अडकला होता. आमिरचे हे नाते 2002पर्यंत टिकले. इरा आपली आई रीना आणि भाऊ जुनैदसह राहतो. ICSI बोर्डमध्ये चांगले गुण घेतल्यानंतर आमिरलासुध्दा खूप आनंद झाला असावाच यात काहीच शंका नाहीये.
इराच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे आमिरला इतका आनंद झाला आहे, की त्याने तिच्या गुणपत्रिकेचा फोटो आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर केला आहे. आमिरच्या जवळच्यांनुसार, इराला यश मिळणार याविषयी त्याला सुरूवातीपासूनच विश्वास होता. परंतु जेव्हा इराने यश मिळवून दाखवल्यानंतर तो ते गुपित ठेऊ शकला नाही.
रीना-आमिरला आहेत दोन मुले
रीना-आमिर यांना दोन इरा (19 वय) आणि जुनैद (21 वय) हे दोन मुले आहेत. इरा आणि जुनैद सध्या शिक्षण घेत आहेत. आमिरचा मुलागा जुनैदविषयी चर्चा आहे, की तो लवकरच फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवणार आहे.
आमिर आणि किरण राव
2002मध्ये रीनापासून विभक्त झाल्यानंतर 28 डिसेंबर 2005मध्ये आमिरने किरण रावसह लग्न केले. किरणने लग्नापासून ते आतापर्यंत आमिरला नेहमी पाठिंबा दिला आहे. ती सिनेमांच्या बाबतीत आमिरला नेहमी मदत करत असते. आमिरसुध्दा किरणचा खूप आदर करतो आणि वेळोवेळी तिच्याकडून सल्ला घेत असतो.
आमिर-किरणला आहे एक मुलगा
आमिर-किरण यांना आझाद नावाचा एक मुलगा आहे. आझाद जवळपास 2 वर्षांचा आहे. आमिर आझादची खूप काळजी घेतो. आझादने आयव्हीएफ तंत्रज्ञान सरोगेट मदरव्दारे जन्म घेतला आहे.
तसे पाहता, आमिर आपल्या पहिल्या पत्नी रीनापासून जरी विभक्त झाला असला तरी सतत त्यांच्या संपर्कात असतो. रीनासह त्याचे मुलेसुध्दा त्याच्या संपर्कात असतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा आमिरच्या लाडक्या लेकीचे काही खास छायाचित्रे...