आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FAMILY PHOTOS: भेटा जॅकी श्रॉफच्या पत्नी, मुलगा आणि मुलीला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः पत्नी आएशा, मुलगी कृष्णा आणि मुलगा टायगरसोबत जॅकी श्रॉफ )
मुंबईः आपल्या अभिनयाने एक काळ गाजवणारे अभिनेते जॅकी श्रॉफ (जयकिशन श्रॉफ) 1 फेब्रुवारी रोजी 58 वर्षांचे झाले. कौटुंबीक सिनेपार्श्वभूमी नसताना बॉलिवूडमध्ये यशोशिखर गाठणा-या कलाकारांपैकी जॅकी दादा एक आहेत. सिनेमात काम करण्यापूर्वी त्यांनी काही जाहिरातींमध्ये काम केले होते. 1982मध्ये 'स्वामी दादा' या सिनेमाद्वारे त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या सिनेमात त्यांची छोटेखानी भूमिका होती. मात्र याच सिनेमातून ते प्रख्यात दिग्दर्शक सुभाष घईंच्या नजरेस पडले. सुभाष घईंनी त्यांच्या 'हीरो' या सिनेमात जॅकी दादांना लीड रोल दिला. 1983 मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. बघता बघता जॅकी श्रॉफ बॉलिवूडचे सुपरस्टार बनले. जयकिशन श्रॉफ यांना 'जॅकी' हे नाव सुभाष घईंनीच दिले आहे.
मेहरबानियां, कर्मा, राम-लखन, त्रिदेव, परिंदा, दूध का कर्ज, इज्जत, 100 डेज, खलनायक, आइना, देवदास हे जॅकी दादांचे निवडक गाजलेले सिनेमे आहेत. 2014 मध्ये आलेल्या धूम 3 या सिनेमात ते झळकले होते. आपल्या चार दशकांच्या करिअरमध्ये जॅकी दादांनी 9 भाषांमध्ये 175हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.
जॅकी श्रॉफ यांचे कुटुंब
जॅकी यांचा जन्म महाराष्ट्रातील लातू जिल्ह्यातील उदगीर येथे एका गुजराती कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव काकूभाई श्रॉफ आणि आईचे नाव रीता आहे. जॅकी यांच्या कुटुंबात पत्नी आएशा आणि दोन मुले आहेत. त्यांच्या मुलाचे नाव टायगर आणि मुलीचे नाव कृष्णा आहे. टायगरने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे,
पुढील स्लाईड्समध्ये पाहा जॅकी दादांच्या कुटुंबीयांची खास छायाचित्रे...