(छायाचित्रः नव्या नवेली नंदा)
मुंबईः नव्या नवेली नंदा, हे नाव आहे शतकाचे महानायक
अमिताभ बच्चन यांच्या नातीचे. ती
बिग बींची थोरली मुलगी श्वेता नंदा हिची मुलगी आहे. श्वेताचे लग्न दिवंगत अभिनेते राज कपूर यांचे नातू आणि ऋतू नंदा यांचा मुलगा निखिल नंदासोबत झाले आहे. निखिल आणि श्वेता या दाम्पत्याला एक मुलगी आणि एक मुलगा असून नव्या आणि अगस्त्य नंदा ही त्यांची नावे आहेत.
17 वर्षीय नव्या सध्या लंडमध्ये शिक्षत आहे. लंडनमधील सेव्हन ऑक्स शाळेत ती शिक्षण घेत आहे. याच शाळेत बॉलिवूडचा किंग अर्थातच
शाहरुख खानचा थोरला मुलगा आर्यनसुद्धा शिकत आहे. नव्या आणि आर्यन केवळ क्लासमेटच नव्हे तर चांगले मित्रसुद्धा आहेत. हे दोघेही शाळेतील गेट टू गेदर आणि ट्रिप्समध्ये अनेकदा एकत्र दिसले आहेत.
नोटः महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 72 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने divyamarathi.com तुम्हाला त्यांची नात नव्या नवलेची ओळख करुन देत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा नव्याची फॅमिली आणि फ्रेंड्ससोबतची खास छायाचित्रे...