मुंबईः बच्चन कुटुंबाचा उल्लेख होताच, अमिताभ-जया आणि अभिषेक-ऐश्वर्या यांची नावे समोर येतात. मात्र या चौघांव्यतिरिक्त बच्चन कुटुंबातील अनेक सदस्यांना सामान्य लोक ओळखत नाहीत.
बच्चन कुटुंब हिंदी सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित कुटुंब आहे. अमिताभ यांना एक धाकटे बंधू असून त्यांचे नाव अजिताभ बच्चन आहे. अजिताभ
आपल्या कुटुंबासह लंडनला वास्तव्याला होते. मात्र 2007 मध्ये ते आपल्या कुटुंबासोबत भारतात शिफ्ट झाले. अजिताभ यांच्या पत्नीचे नाव रमोला असून या दाम्पत्याला एकुण चार (मुलगा भीम, तीन मुली- नीलिमा, नम्रता, नैना) मुले आहेत. काही दिवसांपूर्वीच अजिताभ यांची मुलगी नैना बच्चन बॉलिवूड अभिनेता कुणाल कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली होती.
बच्चन कुटुंब बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीसुद्धा देशातील चर्चित कुटुंब राहिले आहे. अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन प्रसिद्ध कवी होते. त्यांचा आई तेजी बच्चन आणि इंदिरा गांधी यांच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या.
11 ऑक्टोबर रोजी बिग बींचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने आम्ही तुम्हाला बच्चन कुटुंबातील इतर सदस्यांची ओळख करुन देत आहोत...
पुढील स्लाईड्समध्ये पाहा कोणकोण आहेत बिग बींच्या कुटुंबात...