आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीराज यांचा नातू, राज कपूर यांचा मुलगा आहेत रणधीर, भेटा त्यांच्या कुटुंबीयांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- रणधीर कपूर मुलगी करीना आणि करिश्मा कपूरसोबत)
मुंबई- बॉलिवूडमध्ये 'रामपूर का लक्ष्मण' सिनेमातून ओळख मिळवणारे रणधीर कपूर आज 68 वर्षांचे झाले आहेत. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये बालकलाकाराच्या रुपाच वडील राज कपूर यांच्या 'श्री 420' सिनेमात काम केले होते. मात्र अभिनेता म्हणून त्यांनी 1971मध्ये 'लव्ह आज और कल' सिनेमातून यशस्वी पदार्पण केले.
रणधीर यांनी 70 आणि 80 दशकांत 'रामपूर का लक्ष्मण', 'जवानी दिवानी', 'हाथ की सफाई', 'पोंगा पंडित', 'धरम करम', 'मामा भांजा', 'हीरालाल पन्नालाल', 'चोर के घर चोर', 'भक्ति मे शक्ति'सारख्या अनेक सिनेमांत काम केले. 1971 ते 1987पर्यंत त्यांनी जवळपास 34 सिनेमांत मुख्य भूमिका साकारली. यामध्ये 22 पेक्षा जास्त सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले.
त्याकाळी त्यांचे मानधन सुपरस्टार धर्मेंद्र यांच्यापेक्षा थोडीच कमी होती. इंडस्ट्रीमध्ये यशस्वी अभिनेता झाल्यानंतर त्यांनी 'राम तेरी गंगा मैली' आणि 'हिना'सारखे सिनेमे निर्मित केले. यादरम्यान त्यांनी भाऊ राजीव कपूर आणि ऋषी कपूर यांच्यासोबतसुध्दा सिनेमे केले.
इंडस्ट्रीमधील सर्वात यशस्वी घराण्यातील मुलगा आहेत रणधीर-
रणधीर कपूर यांची ओळख पृथ्वीराज कपूरचा नातू, राज कपूर यांचा मुलगा, करिश्मा करीनाचे वडील अशीदेखील आहे. यासोबतच, त्यांची पत्नी बबीतासुध्दा गतकाळातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या रणधीर यांच्या कुटुंबाविषयी...