आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा बॉलिवूड स्टार्सच्या तरुण मुलांना, बघा त्यांची छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'हीरोपंती' या सिनेमाद्वारे आणखी एका स्टार पुत्राने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. हा स्टार पुत्र आहे टायगर श्रॉफ, अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा. पहिल्याच सिनेमातून टायगरने आपल्या लूक्स, बॉडी आणि डान्सने प्रेक्षकांचे लक्ष स्वतःकडे आकर्षित केले आहे. मात्र आपल्या अभिनयातून तो विशेष छाप सोडू शकलेला नाहीये. तसे पाहता आत्ताच त्याच्या अभिनय कौशल्यावर मत नोंदवणे, तशी घाई ठरु शकते.
एखाद्या नवोदितासाठी तो लांबचा पल्ला गाठेल की नाही, हे त्याच्या पहिल्या सिनेमावरुन ठरवले जाते. सिने इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यामध्ये कलाकारांनी भरपूर नाव-पैसा-प्रसिद्धी कमावली, मात्र त्यांची मुले हे सर्व कमावण्यात अपयशी ठरले. तर काही असे कलाकार आहे, ज्यांची मुले फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. तर काही पडद्यामागील बारकावे शिकत आहेत.
या यादीत जॅकी श्रॉफशिवाय सनी देओल, शाहरुख खान यांच्या मुलांचा समावेश आहे. या अभिनेत्यांची मुले एखाद्या स्टारपेक्षा कमी नाहीते.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्टारपुत्रांची खास झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्टार पुत्रांची खास छायाचित्रे...