आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY : बिपाशा झाली 36 वर्षांची, पाहा कुटुंबीयांसोबतची खास छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : वडील हीरक बसू, आई ममता (मध्यभागी) बहीण बिदिशा आणि भाची निराजिता (बिदिशाची मुलगी) सोबत बिपाशा)
मॉडेलिंग क्षेत्रातून अभिनयाकडे वळलेली अभिनेत्री बिपाशा बसू आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. 7 जानेवारी रोजी दिल्लीत एका बंगाली कुटुंबात जन्मलेली बिपाशा वयाच्या 8व्या वर्षापर्यंत दिल्लीत वास्तव्याला होती. तिचे सुरुवातीचे शालेय शिक्षण दिल्लीतील नेहरु प्लेसस्थित एपीजे हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर तिचे कुटुंब कोलकाता येथे शिफ्ट झाले.
मॉडेलिंगमध्ये यशस्वी ठरल्यानंतर बिपाशा 2001 मध्ये 'अजनबी' या सिनेमाद्वारे पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर राज, इरोटिक थ्रिलर जिस्म, नो एंट्री, फिर हेराफेरी, धूम-2 या हिट सिनेमांमध्ये झळकली. बिपाशाचा आगामी अलोन हा सिनेमा येत्या 16 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे.
बिपाशाचे कुटुंब
बिपाशाचे वडील हीरक बसू एक सिव्हिल इंजिनिअर असून त्यांची स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. बिपाशाचे शालेय शिक्षण दिल्लीनंतर कोलकाता येथील कनोरिया विद्या मंदिर येथे झाले. तिच्या कुटुंबात वडील हीरक बसू, आई ममता बसू, थोरली बहीण बिदिशा आणि धाकटी बहीण बिजेता आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा बिपाशाची तिच्या कुटुंबीयांसोबतची खास छायाचित्रे...