आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरचा मुलगा-ऐश्वर्याची मुलगी, भेटा सेलेब्सच्या 10 वर्षांपेक्षा लहान चिमुकल्यांना...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आमिर खान मुलगा आझाद आणि ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्यासह)
मुंबई - फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलेब्स सार्वजनिक ठिकाणी आपल्या मुलांसह दिसतात. एखाद्या इव्हेंटमध्ये जेव्हा हे स्टार किड्स दिसतात, तेव्हा त्यांची उपस्थिती त्यांच्या पालकांपेक्षा जास्त महत्त्वाची ठरते. मुंबईत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या चॅरिटी फुटबॉल मॅचवेळी असेच दृश्य पाहायला मिळाले. या मॅचमध्ये आमिर खान, हृतिक रोशन आणि अभिषेक बच्चनसह अनेक सेलेब्स सहभागी झाले होते. मात्र या सर्व सेलिब्रिटींमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो आमिरचा धाकटा मुलगा आझाद.
मुख्य मॅचनंतर ज्युनिअर आमिर ज्युनिअर बी अर्थातच अभिषेकसह फुटबॉल खेळताना दिसला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चिमुकल्याने चक्क गोल केला. व्हाइट टी-शर्ट, रेड शॉर्ट आणि स्पोर्ट्स शूमध्ये आझाद खूप क्युट दिसत होता. आझादला फुटबॉल खेळताना पाहून त्याची आई किरण खूप आनंदी दिसली.
आझाद आमिर आणि त्याची दुसरी पत्नी किरण रावचा मुलगा आहे. आमिरला पहिली पत्नी रिना दत्तापासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. जुनैद आणि इरा ही त्यांची नावे आहेत. आझादचा जन्म 1 डिसेंबर 2011 रोजी झाला. आझाद आता अडीच वर्षांचा आहे.
तसे पाहता बी टाऊनमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांची मुले दहा वर्षांपेक्षा लहान आहेत. यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन, संजय दत्तचे ट्विन्स, फराहची तिळी मुले यांचा समावेश आहे. या स्पेशल पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच मुलांची ओळख करुन देत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि भेटा इंडस्ट्रीतील सेलेब्सच्या चिमुकल्यांना...