आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Daniel Bauer The Make Up Artist Of Bollywood Actresses

आघाडीच्या अभिनेत्रींचा करतो मेक-अप, आज नटवणार सलमानच्या बहिणीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- ऐश्वर्या आणि जॅकलीनचा मेक-अप करताना डेनियल बॉयर)
मुंबई- 18 नोव्हेंबर अर्थातच बॉलिवूड अभिनेता सलमानची बहीण अर्पिता आणि तिचा बॉयफ्रेंड आयुषच्या लग्नाचा दिवस. सलमानने या लग्नसोहळ्यात कोणत्याही कमतरता राहू दिलेली नाहीये. इतकेच काय, अर्पिताच्या मेक-अपसाठी बॉलिवूडचा प्रसिध्द स्टाइलिस्ट डेनियल बॉयरला आमंत्रित करण्यात आले आहे. डेनियलला कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय बच्चन, करीना कपूर आणि अनुष्का शर्मासारख्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या स्टायलिस्टच्या रुपात ओळखले जाते.
कोण आहे डेनियल बॉयर
डेनियल बॉयर भारतातील सर्वात प्रसिध्द मेक-अप आर्टिस्ट आहे. आपल्या कामासाठी तो केवळ भारतातच नव्हे तर परदेशातसुध्दा ओळखला जातो. डेनियलचा जन्म ऑस्ट्रेलियामध्ये झाला. जर्मनीमध्ये लहानचा मोठा झालेल्या डेनियलचे आई इको-थाई आणि वडील जर्मनचे आहेत.
मेक-अप आर्टिस्ट होण्यापूर्वी डेनियल मानसिक परिचारिकाच्या रुपात काम करत होता. त्यानंतर रोजमेरी श्नाइडर म्यूनिख ब्यूटी कंपनी (Rosemary Schneider Munich Beauty Company)शी जोडला आणि तो यो क्षेत्रात सक्रिय झाला. 17 वर्षांच्या करिअरमध्ये त्याने यूरोप आणि अशियामध्ये काम केले. सध्या तो मुंबईमध्ये राहतो. त्याने बॉलिवूडच्या आजच्या आघाडीच्या अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, करीना कपूर आणि प्रियांका चोप्रासह अनेक अभिनेत्री आणि अभिनेते आणि डिझानर्सचा रेग्युलर आर्टिस्ट आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बॉलिवूड अभिनेत्रींचा मेक-अप करतानाची डेनियलची छायाचित्रे...