आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही TV गर्ल अॅडल्ट सिनेमाद्वारे करतेय बॉलिवूडमध्ये एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ही?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री स्वाती कपूर)
मुंबईः बॉलिवूडच्या आगामी 'फुद्दू' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एकीकडे दिग्दर्शक सुनील सुब्रमण्यम पदार्पण करत आहेत, तर दुसरीकडे या सिनेमातील मुख्य अभिनेत्री स्वाती कपूरसुद्धा बी टाऊनमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे. 'फुद्दू' हा एक अॅडल्ट कॉमेडी सिनेमा असून महिमा प्रॉडक्शनअंतर्गत हा सिनेमा तयार होतोय. या सिनेमातील स्टारकास्ट नवोदित आहे, मात्र स्वाती फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे.
कोण आहे स्वाती कपूर?
'फुद्दू' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेण्यास सज्ज असलेली स्वाती छोट्या पडद्यावर झळकली आहे. स्टार प्लस वाहिनीवरील 'काली- एक अग्निपरीक्षा' या मालिकेद्वारे तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. याशिवाय कलर्स वाहिनीवरील 'हमारी सास लीला' या मालिकेतसुद्धा ती झळकली आहे. सोनी वाहिनीवरील 'क्राइम पेट्रोल' या शोमध्ये सुद्धा तिने काम केले आहे. काही पंजाबी सिनेमातसुद्धा तिने काम केले आहे.
'काली- एक अग्निपरीक्षा'मध्ये साकारली होती मुख्य भूमिका...
स्वातीने 'काली- एक अग्निपरीक्षा' या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेत तिच्या पात्राचे नाव रचना होते. बॅडमिंटनच्या क्षेत्रात नाव कमावण्याची इच्छा असलेल्या तरुणीची भूमिका तिने साकारली होती.
'फुद्दू' टीममध्ये अनेक मोठी नावे...
'फुद्दू' या सिनेमाचे दिग्दर्शक सुनील सुब्रमण्यम यांनी अनुराग बसूसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. या सिनेमाचे संगीतकार राणा मजूमदार आहेत, तर मोहित, चौहान, सुनिधी चौहान, केके आणि अरिजीत याचे गायक आहेत. अनुराग बसू यांनी या सिनेमासाठी सुनील यांना मदत केली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'फुद्दू' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण करणा-या स्वातीची निवडक छायाचित्रे...