आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Jackie Shroff Wife Actress And Producer Ayesha Shroff

Pics: ही आहे जॅकी श्रॉफची स्टायलिश पत्नी आएशा, एकेकाळी करायची मॉडेलिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जॅकी श्रॉफ यांची पत्नी आएशा)
अभिनेता जॅकी श्रॉफ यांची पत्नी आएशाची फसवणुक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. आएशाने तिचा मित्र आणि बिझनेस पार्टनर साहिल खानला कायदेशीर नोटीस बजावून आठ कोटी रुपये परत मागितले आहेत.
आएशाने दावा केला आहे, की तिने साहिल आणि आणखी एका मित्रासोबत 2009 मध्ये कर्मा सायबर इंटेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरु केली होती. मात्र ही कंपनी लवकरच डबाबंद झाली. आता साहिल या गुंतवणुकीतील तिचे उर्वरित पैसे परत करत नाहीये.
5 जून 1987 रोजी आएशा जॅकी श्रॉफ यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली. आएशा जॅकी यांचे बालपणीचे प्रेम आहे. वयाच्या 13व्या वर्षी आएशा जॅकी यांच्या प्रेमात पडली होती. 2009 मध्ये आएशा आणि जॅकी विभक्त होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र एका मुलाखतीत आएशाने या बातम्या अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. त्याकाळात 'बूम' या सिनेमाला मिळालेल्या अपयशामुळे आएशाला कोटींचा तोटा झाला होता.
एकेकाळी मॉडेल असलेल्या आएशाने केवळ एका बॉलिवूड सिनेमात काम केले आहे. लग्नानंतर तिने निर्मितीकडे आपला मोर्चा वळवला. जिस देश में गंगा रहता है (2000), बूम (2003), ग्रहण (2001) या सिनेमांची तिने निर्मिती केली आहे. जॅकी एन्टरटेन्मेंट लिमिटेड नावाने आएशाचे प्रॉडक्शन हाऊस आहे.
आएशा आणि जॅकी या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी असून टायगर आणि कृष्णा ही त्यांची नावे आहेत. टायगरने अलीकडेच 'हीरोपंती' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा आएशा श्रॉफची खास छायाचित्रे...