आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Kamal Haasan Younger Daughter's Akshara Haasan

ही आहे कमल हसन यांची धाकटी मुलगी, पाहा तिचे खासगी आयुष्यातील PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- पार्टीदरम्यान अक्षरा हसन)
मुंबई- आातपर्यंत कॅमे-यामागे राहणारी कमल हसन यांची धाकटी मुलगी अक्षरा कॅमे-यासमोर आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. ती 'शमिताभ'मधून बॉलिवूडमध्ये एंट्री घेत आहे. विशेष म्हणजे, या सिनेमात तिला महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभियन करण्याची संधी मिळत आहे.
'शमिताभ'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. मात्र, ट्रेलरमध्ये तिचा कोणताही डायलॉग अद्याप ऐकायला मिळालेला नाहीये. तसेच पाहता अभिनेत्री म्हणून करिअर सुरु करणारी 23 वर्षीय अक्षरा इंडस्ट्रीशी खूप दिवसांपूर्वी जोडलेली होती. ती वडील कमल हसन यांच्यासोबत 'विश्वरुप' सिनेमात सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहत होती. अक्षराचा निर्मिती क्षेत्रात रुची आहे. तिने दिग्दर्शक राहूल ढोलकियासोबतसुध्दा काम केले आहे.
मोठ्या बहिणीच्या क्लोज आहे अक्षरा-
टॉमबॉय अक्षराने अनेक छायाचित्रे सोशल साइट्सवर शेअर केलेली आहेत. त्यामध्ये ब-याच छायाचित्रात ती अभिनेत्री आणि बहीण श्रुती हसनसोबत दिसते. श्रुती बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री म्हणून काम करते आणि अक्षराची बहीण आणि खास मैत्रीणसुध्दा आहे. दोघी बहीणी एकमेकींसोबत खूप वेळ घालवतात. अक्षराला मित्र-मैत्रीणींसोबत काम करायला खूप आवडते.
आईसोबत मुंबईमध्ये राहते अक्षरा-
अक्षरा आई सारिकासोबत मुंबईमध्ये राहते. सारिका कमल हसन यांची दुसरी पत्नी आहे. आईसुध्दा मुलीच्या कामाला संपूर्ण पाठिंबा देते. सोबतच, तिच्यासोबत अनेक इव्हेंटमध्येसुध्दा सामील होते. 'शमिताभ'चा ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्येसुध्दा सारिका अक्षरासोबत दिसल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अक्षरा हसनच्या खासगी आयुष्यातील निवडक छायाचित्रे...