आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics: हृतिक रोशनची भाची, जॅकी श्रॉफची मुलगी, लाइमलाइटपासून दूर आहेत हे स्टार किड्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हृतिक रोशनची भाची सोनारिका सोनी (डावीकडे) आणि जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा)
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची थोरली मुलगी जान्हवी कपूर बी टाऊनमध्ये एन्ट्री घेणार असल्याची चर्चा ब-याच दिवसांपासून रंगत आहे. आता जान्हवी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राला असिस्ट करत असल्याचे समजते. जान्हवी करिअरसाठी भविष्यात कुठल्याही क्षेत्राची निवड करो, मात्र ती आत्ताच एक सेलिब्रिटी बनली आहे.
आपल्या आईसह ती अवॉर्ड फंक्शन्स किंवा फिल्मी इव्हेंट्समध्ये सतत दिसत असते. तिची फॅशन आणि स्टाइल बघून ती या बाबती अपडेट असल्याचे समजते. खरं तर स्टार किड्स वेळेआधीच प्रसिद्धी मिळवतात.
आता हेच बघा ना, ऐश्वर्या राय बच्चन हिची दोन वर्षांची मुलगी आराध्या आणि शाहरुखच्या मुलांविषयी मीडिया आणि चाहते नेहमीच जाणून घेण्यास उत्सुक असतात. मात्र काही स्टार किड्स असेही आहेत, ज्यांच्याविषयी मीडियात कधी फार चर्चा रंगत नाही. ब-याच स्टार मुलांविषयी सामान्यांना विशेष काही ठाऊकसुद्धा नाहीये. यापैकी काही शिक्षण घेत आहेत, तर काही सिनेसृष्टीत पदार्पणाची तयारी करत आहेत.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्टार किड्सविषयी सांगत आहोत, जे लाइमलाइटपासून बरेच दूर आहेत.
सोनारिका सोनीः सोनारिका अभिनेता हृतिक रोशनच्या थोरल्या बहिणीची मुलगी आहे. हृतिकची बहीण सुनैनाची दोन लग्ने झाली आहेत. सोनारिका ही सुनैना आणि तिच्या पहिल्या पतीची मुलगी आहे. खरं तर सोनारिका स्टार कुटुंबातील असूनदेखील लाइमलाइटपासून दूर आहे. ती आपल्या वडिलांसोबत राहते. मात्र रोशन कुटुंबात होणा-या फॅमिली फंक्शन्समध्ये ती सहभागी होत असते.
कृष्णा श्रॉफः अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफची अलीकडेच बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली आहे. जॅकी यांना मुलगा टायगरसोबतच एक मुलगी असून तिचे नाव कृष्णा आहे. एक-दोनदा ती आपल्या वडिलांसोबत सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे. मात्र सहसा ती मीडियापासून दूरच राहते. कृष्णा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, मात्र पडद्यावर नव्हे तर पडद्यामागे ती आपले करिअर करणार आहे. कृष्णाची दिग्दर्शिका व्हायची इच्छा आहे.
पु़ढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या आणखी काही स्टार किड्सविषयी...