(फाइल फोटो : उजवीकडे, श्वेता तिवारी, तिचे पती अभिनव कोहली आणि मुलगी पलक)
मुंबईः टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिचा आज 34वा वाढदिवस आहे. 4 ऑक्टोबर 1980 रोजी प्रतापगड (उत्तर प्रदेश) येथे तिचा जन्म झाला. वयाच्या 18व्या वर्षी श्वेता भोजपूरी सिनेमांचा निर्माता आणि अभिनेता राजा चौधरीसोबत लग्नगाठीत अडकली होती. मात्र त्याच्या विक्षिप्त वागण्याला कंटाळून त्याच्यापासून घटस्फोट घेतला. राजा आणि श्वेताची एक मुलगी असून तिचे नाव पलक आहे. गेल्याचवर्षी श्वेता अभिनेता अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केले.
आपल्या आईच्या लग्नात पलकने ताल धरला होता.
श्वेताने राजा चौधरीसोबत घटस्फोट झाल्यानंतर एका मुलाखतीत सांगितले होते, की "ती आपल्या आयुष्यातील कठीण काळातून जात आहे. याचा सर्वात जास्त परिणाम हा मुलगी पलकवर होतोय. तिला बालपणापासूनच जास्त वेळ देऊ शकले नाही. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ती मुलीपासून दूर राहून सतत काम करत आहे. मात्र आता आपल्या 13 वर्षीय मुलीला जास्तीत जास्त वेळ देऊ इच्छिते."
याशिवाय श्वेताने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले, की अभिनव आणि तिचे मुंबईतील कांदिवली परिसरात दोन फ्लॅट आहेत. त्यापैकी एका फ्लॅटमध्ये अभिनव, पलक आणि ती राहते. तर दुस-या फ्लॅटमध्ये अभिनवचे आईवडील आणि भाऊ निदान वास्तव्याला आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा श्वेता तिवारीची मुलगी पलकची निवडक छायाचित्रे...