(आई वैशाली देखमुख आणि पत्नी जेनेलियासोबत रितेश देशमुख)
काही दिवसांपूर्वीच आईबाबा झालेले बॉलिवूडचे क्युट कपल अर्थातच रितेश आणि जेनेलिया देशमुख आज
आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करत आहे. 3 फेब्रुवारी 2012 रोजी शाही थाटात हे दोघे बोहल्यावर चढले होते.
पहिल्याच सिनेमात जुळले होते सूत...
2003मध्ये तुझे मेरी कसम या सिनेमात ही जोडी एकत्र झळकली होती. याच सिनेमाच्या शूटिंगवेळी रितेश आणि जेनेलियाचे सूत जुळले होते. मात्र त्यांनी आपल्या नात्याविषयी कधीही सार्वजनिकरित्या कबुली दिली नव्हती. नऊ वर्षांच्या डेटिंगनंतर 2012 मध्ये हे जोडपं लग्नगाठीत अडकलं. जेनेलिया देशमुख घराण्याची दुसरी सून आहे. गेल्या वर्षी म्हणजे 25 नोव्हेंबरला जेनेलियाने गोंडस बाळाला जन्म दिला. बॉलिवूडच्या या क्यूट कपलने आपल्या बाळाचे नाव रिआन असे ठेवले आहे.
रितेशची कौटुंबिक पार्श्वभूमी...
महाराष्ट्रातील मोठे राजकारणी घराणे असलेल्या देशमुख कुटुंबात रितेशचा जन्म झाले. दिवंगत राजकारणी विलासराव देशमुख यांचा रितेश दुसरा मुलगा आहे. रितेशला दोन सख्खे भाऊ आहेत. त्याच्या थोरल्या भावाचे नाव अमित देशमुख आणि धाकट्या भावाचे नाव धीरज देशमुख आहे. धीरजचे लग्न बॉलिवूड अभिनेता जॅकी भगनानीच्या बहिणीसोबत झाले आहे. या तिन्ही भावांना एक-एक मुलगा आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला रितेश देशमुखच्या कुटुंबीयांची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा रितेश-जेनेलियाचा फॅमिली अल्बम...