(फाइल फोटोः अभिनेता सलमान खान मानलेली बहीण श्वेता रोहिरासोबत)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट अलीकडेच
सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरासोबत लग्नगाठीत अडकला आहे. 3 नोव्हेंबरला गोव्यात त्यांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नात
सलमान खान आवर्जुन उपस्थित होता. विशेष म्हणजे सलमाननेच श्वेताचे कन्यादान केले.
कसे जुळले सलमान आणि श्वेताचे नातेः
बातम्यांनुसार, श्वेता मुंबईतील एका सिंधी कुटुंबातील असून बालपणापासूनच सलमानची फॅन आहे. एकेदिवशी ती सलमानच्या घरी पोहचली आणि त्याच्या आई सलमा खान यांच्याकडे त्याला
राखी बांधण्याची इच्छा व्यक्त केली. मग काय, मोठ्या मनाच्या सलमानने श्वेताची ही इच्छा पूर्ण केली. तेव्हापासून दरवर्षी श्वेता सलमानला राखी बांधते. सलमान श्वेताला
आपल्या सख्या बहिणीप्रमाणे मानतो. श्वेताचे कन्यादान करुन सलमानने श्वेतावरचे आपले प्रेम व्यक्त केले आहे.
'फुकरे' आणि 'ओ तेरी'मध्ये झळकला आहे पुलकितः
पुलकित सम्राट मुळचा दिल्लीचा आहे. 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेत तो पहिल्यांदा झळकला होता. दिग्दर्शक मृगदीप सिंह लांबा यांच्या 'फुकरे' (2013) आणि उमेश बिष्ट यांच्या 'ओ तेरी' (2014) या सिनेमात तो झळकला आहे. 'ओ तेरी' हा सिनेमा सलमानचे भावोजी (बहीण अलविरा हिचे पती) अतुल अग्निहोत्री यांनी प्रोड्युस केला होता.
कसे जुळले पुलकित आणि श्वेताचे नातेः
पुलकित 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेत काम करत असतानाची ही गोष्ट आहे. त्याकाळात श्वेता एक ट्रेनी जर्नलिस्ट होती. दोघांची भेट याच मालिकेच्या सेटवर झाली. पहिले त्यांच्यात मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 3 नोव्हेंबर रोजी हे दोघे लग्नगाठीत अडकले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा पुलकित सम्राटसोबतची श्वेता रोहिराची खास छायाचित्रे...