आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे सलमान खानची लाडकी भाची, जाणून घ्या तिच्याविषयी आणि पाहा ग्लॅमरस Lookचे 30 Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सलमानची भाची एलिजा अग्निहोत्री बॅकलेस ड्रेसमध्ये, दुस-या छायाचित्रात आपल्या मित्रासह...)
मुंबई - सलमान खानचा बहुप्रतिक्षित 'किक' हा सिनेमा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. यावर्षी रिलीज झालेला सलमानचा हा दुसरा सिनेमा आहे. यावर्षी रिलीज झालेल्या त्याच्या 'जय हो' या सिनेमा 100 कोटींच्या वर बिझनेस केला. मात्र किक यापेक्षा जास्तचा व्यवसाय करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. सलमानच्या या सिनेमाचे प्रमोशन त्याची भाची एलिजा अग्निहोत्रीनेसुद्धा केले. सलमानप्रमाणेच त्याच्या भाचीनेही त्याच्या सिनेमाचे पोस्टर आणि प्रोमोज ट्विटर अकाउंटवर पोस्ट केले होते.
सलमानचे चाहते त्याच्या कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्यांना ओळखतात. त्याचे वडील सलीम खान, आई सलमा खान आणि हेलन, भाऊ अरबाज, सोहेल, बहिणी अलविरा आणि अर्पिता यांना वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. मात्र आता सलमानची भाची एलिजासुद्धा आपल्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे. सलमानच्या या लाडक्या भाचीला फोटो काढण्याचा छंद आहे. एलिजाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या वेगवेगळ्या लूकची अनेक छायाचित्रे पाहायला मिळतात.
एलिजा अग्निहोत्रीविषयी...
एलिजा सलमानची बहीण अलविरा अग्निहोत्रीची मुलगी आहे. अलविराचे लग्न अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक अतुल अग्निहोत्रीसोबत झाले आहे. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. एलिजा हे मुलीचे तर अयान हे त्यांच्या मुलाचे नाव आहे. एलिजा त्यांची थोरली मुलगी आहे. सध्या मुंबईत ती आपले शालेय शिक्षण पूर्ण करत आहे. मित्रांसह धमाल-मस्ती करणे, वाचन करणे आणि फिरणे हे तिचे आवडते छंद आहे. सुंदर असण्यासोबतच ती मनमौजी आहे.
मामी मलायका देणार का साथ?
एलिजा सध्या शिकत आहे. भविष्यात कोणत्या क्षेत्राची निवड करायची याचा निर्णय एलिजालाच घ्यायचा आहे. मात्र खान फॅमिलीतून केवळ मलायका अरोरा खान एकमेव अशी स्त्री आहे, जी बॉलिवूडमध्ये काम करत आहे. त्यामुळे भविष्यात एलिजाने आपल्या मामीच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली तर नवल वाटायला नको.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा एलिजा अग्निहोत्रीची ग्लॅमरस लूकची खास छायाचित्रे... ही सर्व छायाचित्रे एलिजाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन घेण्यात आली आहेत.