आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा शाहरुख खानच्या डुप्लिकेटला, बॉलिवूडमध्ये त्याच्यासोबतच करतो काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहरुख खानचा डुप्लिकेट प्रशांत वाळदे)
मुंबईः प्रशांत वाळदे या मिमिक्री आर्टिस्टला जर तुम्ही लांबून पाहिले तर आपशाहरुख खानलाच बघतोय असा भास झाल्याशिवाय राहात नाही. मुळचा नागपूरचा असलेल्या प्रशांत वाळदेला जेव्हा कळले, की तो शाहरुखप्रमाणे हुबेहुब दिसतो, तेव्हापासून त्याने मुंबईला आपले घर आणि बॉलिवूडला कर्मभूमी बनवले आहे. जेथे शाहरुख शूटिंग करत असतो, तेथे प्रशांतला हमखास बघितले जाते. प्रशांतने शाहरुखसोबत 'ओम शांति ओम' 'डॉन 2' आणि 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमांमध्ये काम केले आहे. divyamarathi.comचे प्रतिनिधी ओंकार वैद्य यांनी अलीकडेच 'फॅन' या आगामी सिनेमाच्या सेटवर प्रशांतची भेट घेतली. या भेटीदरम्यान प्रशांतने स्वतःविषयीच्या अनेक गोष्टी शेअर केल्या. प्रशांतची खास मुलाखत तुमच्यासाठी...
तू शाहरुखप्रमाणेच राहतो, हे किती रंजक आहे तुझ्यासाठी?
- मी हुबेहुब शाहरुख खानप्रमाणे दिसतो. शाहरुखसोबत सिनेमे आणि जाहिराती बनवणा-यांसाठी मी हँडी मॅन आहे. रिहर्सलवेळी किंवा एखाद्या ठराविक सीनसाठी कॅमेरा अँगल फिक्स करण्यासाठी दिग्दर्शक शाहरुखच्या डमी स्वरुपात माझा वापर करतात. जेव्हा शॉट फायनल होतो, तेव्हा शाहरुख खान येतो आणि फायनल टेक देतो. तो फायनल टेक तुम्हाला सिनेमात बघायला मिळतो.
म्हणजेच तुझे काम ऑफ स्क्रिनच आहे?
- नाही, तुम्ही मला ऑन स्क्रिनसुद्धा बघितले आहे, मात्र मी शाहरुखचा डुप्लिकेट आहे, हे तुम्हाला तेव्हा ओळखता आले नसावे. ओम शांति ओम, डॉन 2 आणि चेन्नई एक्स्प्रेस या सिनेमांत काम केले आहे. शाहरुख अतिशय बिझी आणि महागडा अभिनेता आहे. म्हणूनच जेव्हा एखादा मोठा शॉट देण्याची गरज असते, (ज्यात चेहरा स्पष्ट दिसणे गरजेचे नसते) तेव्हा मी फ्रेममध्ये येतो. याशिवाय जेव्हा शाहरुखचा पाठमोरा भाग दाखवायचा असतो तेव्हादेखील मी शॉट देतो.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा संपूर्ण मुलाखत...