आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अगदी अमृतासारखीच दिसते मुलगी सारा, या Star Kidsमध्येही बघायला मिळते Parentsची झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : अमृता सिंह आणि सारा खान)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंह 57 वर्षांची झाली आहे. अमृताचा जन्म 9 फेब्रुवारी 1958 रोजी एका शिख कुटुंबात झाला. तिची मुलगी सारा अगदी हुबेहुब तिच्यासारखीच दिसते. साराला बॉलिवूड सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. मात्र साराने सध्या सिनेमांऐवजी अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावे, असे अमृताचे म्हणणे आहे. अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची सारा थोरली कन्या आहे.
साराप्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक स्टार किड्स हुबेहुब आपल्या पालकांप्रमाणे दिसतात. शाहरुखचा मुलगा आर्यनमध्ये त्याच्या वडिलांची झलक बघायला मिळते, तर सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमसुद्धा अगदी त्याच्यासारखाच दिसतो. सैफ आणि इब्राहिम यांची बालपणीची छायाचित्रे बघितली असता, यापैकी सैफ कोण आणि इब्राहिम कोण हे ओळखणे कठीण होईल.
एक नजर टाकुया अशा काही स्टार किड्सवर जे अगदी आपल्या पालकांप्रमाणे दिसतात.
सारा अली खान
सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृचा सिंह यांची मुलगी सारा लूक्समध्ये आपल्या आईवर गेली आहे. तिचे हसणे, डोळे बघून कुणीही अचंबित होईल. अनेकदा साराचे लूक्स तिची आई अमृताच्या बेताब या सिनेमाच्या काळातील आठवण करुन देतात.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या आणखी काही स्टार किड्सविषयी...