आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet The Pakistani Actor Mikaal Zulfiqar Who Played Importante Role In 'Baby'

'बेबी'त अक्षयचा मित्र आहे हा पाकिस्तानी हीरो, पाहा पत्नी-मुलीसोबतचे Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मिकाल जुल्फिकार आणि त्यांच्या पत्नी सारा भट्टी)
मुंबईः अभिनेता अक्षय कुमारच्या अलीकडेच रिलीज झालेल्या 'बेबी' या सिनेमावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. मात्र या सिनेमात एका पाकिस्तानी अभिनेत्यांने महत्त्वपूर्ण भूमिका बजावळी आहे. या पाकिस्तानी अभिनेत्याचे नाव आहे मिकाल जुल्फिकार. या सिनेमात मिकालने साऊदी अरबमध्ये वास्तव्याला असलेल्या अक्षयच्या मित्राची भूमिका साकारली आहे. सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये अक्षय मौलाना मोहम्मद रहमानची भारतात येण्यासाठी मदत करतो. 'बेबी' मिकालचा पहिला बॉलिवूड सिनेमा आहे.
कोण आहे मिकाल..
मिकाल एक पाकिस्तानी-ब्रिटिश अभिनेता आहे. मिकालचे वडील पाकिस्तानी तर आई यूकेची रहिवासी आहे. लंडनमध्ये मिकालचा जन्म झाला. त्याचे बालपण पाकिस्तान आणि लंडनमध्ये गेले. सध्या मिकाल कराचीत वास्तव्याला आहे. 1997 मध्ये तो लंडनहून पाकिस्तानात स्थायिक झाला. त्याच्या पत्नीचे नाव सारा भट्टी असून त्याला दोन मुली आहेत.
पाकिस्तानी सिनेमे आणि टीव्ही मालिकांमधून मिळवली प्रसिद्धी...
मिकाल मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. पाकिस्तानी सिनेमे आणि टीव्ही मालिकांसाठी त्याला ओळखले जाते. 'गॉडफादर' (2007), 'शूट ऑन साइट' (2007), 'अभी तो मैं जवान हूं' (2013) हे सिनेमे आणि 'साइका' (2009), 'दिल है छोटा सा' (2010), 'पानी जैसा प्यार' (2011) आणि 'शेर-ए-जाट' (2012) या टीव्ही मालिकांमध्ये मिकालने अभिनय केला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मिकालची पत्नी आणि मुलींसोबतची खास छायाचित्रे...