आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bollywood Actresses Like Urmila, Sushmita, Nagma Are Still Single

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

41 वर्षीय उर्मिला आहे Single, पस्तीशी-चाळीशी ओलांडलेल्या या अभिनेत्रीसुद्धा आहेत अविवाहित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः उर्मिला मातोंडकर)
'रंगीला', 'खुबसुरत' आणि 'जानम समझा करो'सारख्या दमदार सिनेमांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचा आज 41वा वाढदिवस आहे. 4 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबईत उर्मिलाचा जन्म झाला. बालकलाकाराच्या रुपात हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या उर्मिलाने अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. 'रंगीला', ‘चमत्कार’ (1992), ’रंगीला’ (1995), ’जुदाई’ (1997), ’सत्या’ (1998), ’मस्त’ (1999), 'खूबसूरत’ (1999), ’प्यार तूने क्या किया’ (2001), ’भूत’ (2003) यांसारखे अनेक हिट सिनेमे तिच्या नावी आहेत.
आता उर्मिला लाइमलाइटपासून दूर आहे. 2005 ते 2008 याकाळात तिने काही सिनेमांमध्ये छोटेखानी भूमिका साकारल्या होत्या. 2008मध्ये हिमेश रेशमियाच्या 'कर्ज' या सिनेमात ती झळकली होती. मराठीत सुजय डहाके दिग्दर्शित 'आजोबा' या सिनेमातही तिने काम केले. अधूनमधून फिल्मी पार्टीजमध्ये तिची झलक बघायला मिळत असते.
वयाची 41 वर्षे पूर्ण करणा-या उर्मिलाने अद्याप लग्न केलेले नाही. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत उर्मिलाने सांगितले होते, की तिला बॉयफ्रेंड नाही आणि कधी लग्न करणार याचेसुध्दा काहीच नियोजन नाही.
वयाची चाळीशी ओलांडूनही अद्याप अविवाहित असलेली उर्मिला बी टाऊनमधील एकमेव अभिनेत्री नाहीये. येथे नावाजलेल्या अनेक अभिनेत्री आजही सिंगल आहेत. याच अभिनेत्रींविषयी आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये सांगत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, वयाची पस्तीशी आणि चाळिशी ओलांडल्यानंतरही अविवाहित असलेल्या अभिनेत्रींविषयी..