आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Death Aniv: महमूद यांनी बिग बींना दिला होता आधार, वाचा Lifeचे रंजक Facts

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: अमिताभ बच्चन आणि महमूद अली
40च्या दशकात ब्लॅक अँड व्हाइट सिनेमे होते. भारतीय हिंदी सिनेमाच्या या काळात सिनेमे रंगेबेरंगी नव्हती मात्र कॉमेडी आणि मनोरंजानासाठी त्यावर उत्कृष्ट काम केले जात होते. या काळातच महमूद अली यांनी विनोदवीर म्हणून कामास सुरुवात केली होती. महमूद यांनी अभिनय क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली. सोबतच, सिनेमासुध्दा ते हिरोपेक्षा चोख भूमिका पार पाडत होते. आज त्यांची आठवण काढण्याचे कारण म्हणजे आजच्याच दिवशी 2004मध्ये त्यांचे निधन झाले होते.
महमूद यांची आज 10वी पुण्यतिथी आहे. परंतु चाहत्यांच्या मनात त्यांची आठवण आणि सिनेमे आजही जिवंत आहेत. त्यांचा जन्म 29 सप्टेंबर 1932मध्ये मुंबई येथे झाला. त्यांनी 'भूत बंगाला', 'पडोसन', 'बॉम्बे टू गोवा', 'गुमनाम', 'कुंवारा बाप'सारख्या अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले. महमूद यांनी फिल्म इंडस्ट्रीमधील जवळपास सर्वच अभिनेते आणि अभिनेत्रींसह काम केले. महमूद यांनी 'सीआयडी' या सिनेमापासून करिअरला सुरुवात केली होती. 'पडोसन'चे 'एक चतुरनार बडी होशियार' हे गाणे आजही लोकांच्या ओठांवर रेंगळते.
तसे पाहता, महमूद यांनी सर्वाधिक विनोदवीराच्याच भूमिका सिनेमात साकारल्या. परंतु प्रेक्षक रुपेरी पडद्यावर त्यांच्या एंट्रीची आतुरतेने प्रतिक्षा करायचे. महमूद यांनी अनेक विनोदवीरांना सिनेमात काम करण्याची संधी प्राप्त करून दिली.
अमिताभ बच्चन यांनाही केली मदत
महमूद यांनी 'बॉम्बे टू गोवा'मध्ये अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिकेसाठी काम दिले होते. त्याकाळी महमूद यांचे अरूणा ईराणी यांच्यासह अफेअर चालू होते. त्यामुळे अमिताभ यांनी अरुणा ईराणी यांचा सिनेमात हात पकडण्यास लाज वाटायची. 'बॉम्बे टू गोवा' हिट झाला आणि अमिताभ यांना 'जंजीर' सिनेमा करण्याची संधी मिळाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या महमूद यांची काम करण्याची पध्दत इतरांपेक्षा कशी वेगळी होती...