आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या सेटवर झाडू मारायचा हृतिक, स्वतः मायकल आला होता भेट घ्यायला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडमध्ये एकीकडे आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांच्या लग्नामुळे आनंदाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे हृतिक रोशन आणि सुझान रोशन यांच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे नाराजीचे वातावरण आहे. हृतिक-सुझानने अलीकडेच मुंबईतील वांद्रा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. 31 ऑक्टोबर 2014 पर्यंत हे दोघे कायदेशीररित्या विभक्त होणार आहेत. हृतिक या घटस्फोटामुळे खुश नाहीये. त्याने अनेकदा सुझानची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही.
सुझानपासून नेहमीसाठी विभक्त होत असलेल्या हृतिकच्या आयुष्यात बालपणापासूनच अनेक अडचणी होत्या. तो कधी स्टार बनेल, अशी आशा त्याच्या कुटुंबीयांना मुळीच नव्हती. मात्र हृतिकने आत्मविश्वासाच्या बळावर यश प्राप्त केले आणि आज तो बी टाऊनमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
बी टाऊनमध्ये पदार्पण करण्यापूर्वी हृतिकने स्वतःवर विशेष मेहनत घेतली होती. यासाठी त्याने अभिनय, फेंसिंग, डान्सिंग आणि रायडिंगचे धडे गिरवले. आजही तो एखाद्या भूमिकेसाठी जीवतोड मेहनत घेत असतो. हृतिकमध्ये सुपरस्टारमध्ये लागणारे सर्व गुण आहेत.
हृतिकच्या आयुष्यात सध्या बराच ताण-तणाव आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला त्याच्या खासगी आयुष्यातील काही खास गोष्टी सांगत आहोत, याविषयी कदाचित त्याच्या चाहत्यांना ठाऊक नसावे.
हृतिकच्या आयु्ष्याशी निगडीत फॅक्ट्स...
शुटिंगदरम्यान हृतिक त्याच्या वडिलांना एखाद्या सामान्य तरुणाप्रमाणे शुटिंग सेटवर मदत करायचा.सेटवर तो लोकांना चहा देण्याचे आणि झाडू मारायचे काम करायचा.
राकेश रोशन यांच्यावर झालेल्या हल्ल्याने ऋतिकला स्तब्ध करुन टाकले होते. त्यानंतर ऋतिक बॉलिवूड सोडणार अशीही चर्चा रंगू लागली होती.
किशोरवयात अभिनेत्री मधुबाला आणि नंतर परवीन बॉबी त्याच्या क्रश होत्या.
हतिकने 1980 साली पहिल्यांदा कॅमेरा फेस केला होता. वयाच्या सहाव्या वर्षी ऋतिकने 'आशा' या सिनेमातील डान्स सिक्वेन्समध्ये एक्स्ट्रा म्हणून काम केले होते.
2008मध्ये काइट्स सिनेमाच्या शुटिंगदरम्यान मायकल जॅक्सन हृतिकची भेट घ्यायला सेटवर पोहोचला होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या हृतिकविषयी बरेच काही....