आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्माते सुधीर भट यांची अखेरची निर्मिती \'बेईमान\', सुयोगचे आव्हानात्मक कानेटकरी नाटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांचे आज रात्री उशिरा ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रात्री त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना हिंदूजा रूग्णालयात दाखल केले होते. मात्र, तेथे त्यांची प्राणज्योत मावळली. मराठी रंगभूमीचा शो मॅन म्हणून सुधीर भट यांना ओळखले जात होते. एका लग्नाची गोष्ट, किरवंत, चार दिवस प्रेमाचे, ती फुलराणी ० त्यांची नाटकं विशेष गाजली होती. याचबरोबर त्यांनी आपल्या सुयोग नाट्यनिर्मिती संस्थेतर्फे सुमारे 80 नाटकांची निर्मिती केली. शिवाय त्यांनी देश-विदेशात शो केले होते. सुधीर भट यांच्या अकाली निधनामुळे नाट्सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सुधीर भट यांची सुयोग ही नाट्यसंस्था सध्या 'बेईमान' हे नाटक रंगभूमीवर आणण्याच्या तयारीत होते. सुधीर भट यांच्या निधनामुळे 'बेईमान' हे नाटक त्यांची अखेरची निर्मिती ठरली आहे.

'बेईमान' मराठी रंगभूमीवरील प्रचंड गाजलेले नाटक. 'बेईमान'मधली प्रभाकर पणशीकर आणि सतीश दुभाषी या दोन दिग्गज अभिनेत्यांच्या जुगलबंदीची आठवण आजही पिढ्यांपिढ्या जागवली जाते. 1973 साली प्रा. वसंत कानेटकर यांनी बेकेट या फ्रेंच नाटकाचा बेईमान हा मराठी अनुवाद केला. या नाटकाचे निर्माते स्वतः प्रभाकर पणशीकर होते. पंतानी नाटकात चंदरची महत्त्वाची भूमिकाही निभावली. बेईमानचे 368 यशस्वी प्रयोग झाले. मुळ नाटकाचे दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर होते.

इतकं गाजलेलं नाटक असूनही हे नाटक 40 वर्षे बंद होते. कारण हे नाटक पेलणे हेच मोठे आव्हान होते. जे शिवधनुष्य 40 वर्षे कोणाला पेलता आले नाही ते शिवधनुष्य पेलायचे ठरवले निर्माते सुधीर भट यांनी.
दिवंगत निर्माते सुधीर भट यांची सुयोग ही नाट्यसंस्था हे नाटक नवीन संचात आणि नवीन रुपात पुनरुज्जीवित करत आहे. या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे मंगेश कदम यांनी.

या नव्या 'बेईमान'मध्ये शरद पोंक्षे, तुषार दळवी आणि शीतल क्षीरसागर मुख्य भूमिकेत आहेत. चंदरच्या भूमिकेत तुषार दळवी तर धनराजची भूमिका शरद पोंक्षे साकारणार आहेत. विवेक जोशी, अजय टिल्लू, प्रदीप प्रधान, सुरेश सरदेसाई, अरुण शेलार, वसंत इंगळे या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या नाटकात आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा या नाटकाच्या तालमीची खास छायाचित्रे...