आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mind blowing Action Kick, 57 Cars 13 Buses 1copter Crashed

\'किक\'मध्ये उडणार 57 कार, 13 बस आणि 1 हेलिकॉप्टर, पहिल्यांदाच हिंदी सिनेमात एवढ्या गाड्यांचा वापर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो: 'किक'मधील एका दृश्यात सलमान खान
ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा अ‍ॅक्शन सीन्स असलेला आणि बिग बजेटचा 'किक' सिनेमा रिलजी होत आहे. सलमानच्या करिअरमधील सर्वाधिक महत्वपूर्ण आणि जास्त पैसे खर्च करण्यात आलेला हा सिनेमा मानला जात आहे. सलमान सिनेमात 'डेव्हिल' अवतारात दिसणार आहे.
बॉलिवूडमध्ये हाणामारी आणि गाड्या उडवण्याचे सर्वात जास्त सीन्स केवळ रोहित शेट्टीच्याच सिनेमात आपल्याला पाहायला मिळतात. मात्र यावेळी हे सीन्स दाखवण्याचे धाडस दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला यांनी 'किक'च्या माध्यमातून केले आहे. सलमानच्या अ‍ॅक्शन सिनेमाचे खास वैशिष्टे म्हणजे, 'किक'मध्ये 57 कार, 13 बस आणि एक हेलिकॉप्टर अ‍ॅक्शन सीन्समध्ये उडवण्यात आले आहेत. आतापर्यंत कोणत्याच सिनेमात अ‍ॅक्शन सीनसाठी इतक्या गाड्या वापरण्यात आल्या नव्हत्या. सलमान सिनेमात दमदार भूमिकेत दिसत आहे.
सलमान आपला बिग बजेटचा प्रत्येक सिनेमा ईदच्या मुहूर्तावर रिलीज करण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याचे म्हणणे आहे, की या काळात जास्त सिनेमे रिलीज होत नाहीत. विशेष म्हणजे, लोक सुटीच्या दिवशी फिरण्यास आणि सिनेमे बघण्यास प्रधान्य देतात.
याविषयी साजिद म्हणतो, की त्याला बिग बजेटचे सिनेमे करण्यात रुची आहे. सिनेमाचे काही शुटिंग लंडन तर काही पोलँडच्या वार्सामध्ये करण्यात आले. सलमानने सर्व स्टंट स्वत: केले आहेत.
सलमानसह सिनेमात जॅकलिन फर्नांडिसला कास्ट करण्यात आले. सिनेमा विषयी सलमान सांगतो, 'साजिदसारखा मनमोकळ्यापणाने सिनेमावर खर्च करणारा दिग्दर्शक मिळणे खूप लकी असते.'
'किक'ची तुलना ब्लॉकब्लस्टर 'धूम 3' आणि 'क्रिश 3' सोबत केली जात आहे. या दोन सिनेमांनंतर हा सिनेमासुध्दा ब्लॉकब्लस्टर ठरु शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सलमानचे 'किक'मधील स्टंट आणि अ‍ॅक्शन सीन्स पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...