आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Miss India Koyal Rana In Top 10 In Miss World 2014 Contest

मिस वर्ल्ड स्पर्धेत TOP 10मध्ये सामील झाली होती मिस इंडिया कोयल राणा, पाहा ग्लॅमरस PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः मिस इंडिया 2014 कोयल राणा)

मिस वर्ल्ड 2014चा किताब दक्षिण आफ्रिकेच्या 22 वर्षीय रोलेन स्ट्रॉस हिने आपल्या नावी केला आहे. भारताच्या वतीने मिस इंडिया कोयल राणा या स्पर्धेत सहभागी झाली होती. या स्पर्धेत जगभरातील 121 देशांतील सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. भारताच्या कोयल राणाने या स्पर्धेत टॉप 10पर्यंत मजल मारली. मात्र टॉप 5मध्ये ती स्थान पटकावण्यात अपयशी ठरली.
मात्र या स्पर्धेत कोयलने दोन पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. तिला या स्पर्धेत 'बेस्ट डिझायनर अवॉर्ड' आणि 'ब्युटी विथ अ पर्पज' हे टायटल मिळाले.
21 वर्षीय कोयल राणाविषयीच्या खास गोष्टी...
- मुळची जयपूरची असलेल्या कोयलचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत झाले. येथेच ती लहानाची मोठी झाली. तिने बिझनेस स्टडीजमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर हॉवर्ड युनिव्हर्सिटीतून इंटरनॅशनल फायनान्स या विषयात उच्च शिक्षण घेतले.
- एप्रिल 2014 मध्ये कोयलने मुंबईत मिस इंडिया 2014चा किताब आपल्या नावी केला. यापूर्वी कोयलने 2008 मध्ये मिस इंडिया टीन आणि 2009 मध्ये मिस युनिव्हर्स टीनचा किताब जिंकला होता.
- मॉडेलिंगसोबतच कोयलला खेळातसुद्धा रुची आहे. स्विमिंग आणि बॅडमिंटन हे तिचे आवडते खेळ आहेत. याशिवाय ती सेमी क्लासिकल आणि कंटमेपरेरी डान्समध्येही निपूण आहे.
- कोयलचा साधी राहणी आणि उच्च विचारसरणीवर विश्वास आहे. तिला कमीत कमी मेकअप करणे पसंत असून काजळ आणि लिपग्लॉस लावणे तिला आवडते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा कोयल राणाची तिच्या फेसबुक अकाउंटवरुन घेण्यात आलेली खास छायाचित्रे...