आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनाक्षीसह 90च्या दशकातील या आघाडीच्या अभिनेत्री बॉलिवूडमधून झाल्या आहेत गायब!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः मिनाक्षी शेषाद्री)
मुंबईः नव्वदच्या दशकातील सदाबहार अभिनेत्रींपैकी एक मिनाक्षी शेषाद्री दीर्घ काळापासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. 16 नोव्हेंबर 1959 रोजी झारखंडमध्ये जन्मलेल्या मिनाक्षीने 1981मध्ये मिस इंडियाचा ताज आपल्या नावी केला होता. वयाच्या सतराव्या वर्षी तिने हा किताब आपल्या नावी केला होता. एवढ्या कमी वयात हा किताब आपल्या नावी करणारी मिनाक्षी पहिली आहे.
1983मध्ये 'पेंटर बाबू' या सिनेमाद्वारे तिने बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली. त्यानंतर 'जुर्म' (1990), 'घायल' (1990), 'शहंशाह' (1988), 'घातक' (1996) आणि 'दामिनी' (1993) हे अविस्मरणीय सिनेमे तिने बॉलिवूडला दिले.
'जुर्म' आणि 'दामिनी' या सिनेमांसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्मफेअरचे नामांकन मिळाले होते. 1995 मध्ये हरीश मैसूर यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर मिनाक्षीने बी टाऊनला रामराम ठोकला. 'घातक' (1996) हा तिचा शेवटचा सिनेमा होता.
मिनाक्षी शेषाद्रीने रविवारी (16 नोव्हेंबर) आपला 51वा वाढदिवस साजरा केला. मिनाक्षीसोबतच अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी 80 आणि 90च्या दशकात नाव, प्रसिद्धी, पैसा आपल्या नावी केला. मात्र अचानक त्या अज्ञातवासात निघून गेल्या.
एक नजर टाकुया या अभिनेत्री कोण आहेत...