आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर्थिक अडचणीमुळे मॉडेलची आत्महत्या, तीन दिवसांनी मिळाला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः मॉडेल अर्चना पांडे)
मुंबईः प्रसिद्ध मॉडेल अर्चना पांडे हिने सोमवारी मुंबईतील अंधेरी येथील राहत्या घरी आत्महत्या केली. अर्चना पांडे 26 वर्षांची होती. तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील न्यू म्हाडा इमारतीमधील फ्लॅटमध्ये ती राहत होती. अर्चनाच्या शेजाऱ्यांनी तिच्या घरातून दुर्गंधी आल्याने पोलिसांना फोनवरून याबाबत महिती दिली. पोलिसांनी फ्लॅटचे दार तोडल्यानंतर अर्चनाचा मृतदेह तिच्या बेडरुममध्ये पंख्याला अटकलेल्या अवस्थेत मिळाला. तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. तिने तीन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असल्याचा पोलिसांना संशय आहे.
पोलिसांना अर्चनाच्या घरातून चिठ्ठी सापडली आहे. प्रियकरासोबत नातेसंबंधातील तणाव आणि आर्थिक अडचणींमुळे तिने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अर्चनाने मॉडेलिंगसह काही दाक्षिणात्य सिनेमांत काम केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील ए 6 इमारतीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये वास्तव्याला होती. 2009मध्ये तिने मॉडेलिंग क्षेत्र सोडले होते आणि एका प्रॉडक्शन हाउसमध्ये काम सुरु केले होते.
पुढील स्लाईड्समध्या पाहा संबंधित छायाचित्रे..