आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Model Archana Pandey's Boyfriend Umar Asif Pathan Arrested

पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळाला होता मॉडेलचा कुजलेला मृतदेह, बॉयफ्रेंडला झाली अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- मॉडेल अर्चना पांडे)

मुंबईः मॉडेल अर्चना पांडे आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. घटनेच्या तीन दिवसांनी पोलिसांनी अर्चनाचा बॉयफ्रेंड उमर आसिफ पठानला अटक केली आहे. आसिफ व्यवसायाने बिझनेसमन असून तो 26 वर्षांचा आहे. आसिफला मुंबईतील वर्सोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 26 वर्षीय मॉडेल अर्चनाने अंधेरीतील तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 29 सप्टेंबर रोजी ही घटना उघडकीस आली.
अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील न्यू म्हाडा इमारतीमधील फ्लॅटमध्ये ती राहत होती. अर्चनाच्या शेजाऱ्यांनी तिच्या घरातून दुर्गंधी आल्याने पोलिसांना फोनवरून याबाबत महिती दिली होती. पोलिसांनी फ्लॅटचे दार तोडल्यानंतर अर्चनाचा मृतदेह तिच्या बेडरुममध्ये पंख्याला अटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तिने 26 सप्टेंबर रोजीच आत्महत्या केली असल्याचा पोलिसांना संशय आहे.

पोलिसांना अर्चनाच्या घरातून चिठ्ठी सापडली आहे. प्रियकरासोबत नातेसंबंधातील तणाव आणि आर्थिक अडचणींमुळे आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे या चिठ्ठीत नमूद होते. पोलिसांनी या चिठ्ठीच्या आधारावर अर्चनाच्या बॉयफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आणि आता त्याला ताब्यात घेतले आहे.
अर्चनाने 2009 मध्ये मॉडेलिंग सोडून एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम सुरु केले होते. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ती ठिकठाक कमावत होती, तिला आर्थिक अडचण नव्हती. मात्र अर्चनाच्या मित्रांकडे पोलिसांनी विचारपुस केल्यानंतर त्यांना समजले, की अर्चनाचा भाऊ अश्विन पांडेला एका आंतरराष्ट्रीय फसवणूक प्रकरणी गुजरात क्राइम ब्रांचने अटक केली होती, त्यामुळे अर्चना डिप्रेशनमध्ये होती. अश्विन पांडेला 78 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्या अकाउंटमधून पोलिसांना 76 कोटी रुपये मिळाले होते. भावाच्या जामीनप्रकरणी तिला वारंवार गुजरातला जावे लागत होते.