आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohan Agashe, Vina Jamkar Presented Excellent Award

मोहन आगाशे, वीणा जामकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठीचा पुरस्‍कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग - मराठी-हिंदी सिने-नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना ‘अस्तु’मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर वीणा जामकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. ‘टपाल’साठी जामकरची निवड झाली.
इंटरनॅशनल इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ साऊथ आफ्रिका (इफ्सा) पुरस्काराचा रंगारंग सोहळा शनिवारी रात्री पार पडला. त्यात आगाशे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंधरा वर्षांपासून मराठी रंगभूमीवर कार्यरत असलेल्या वीणा यांनी अनेक मराठी चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. दक्षिण आफ्रिकेतील चित्रपट विभागात अभिनेता हेन्री ऑपरमन यांना ‘मोझॅक इन डाय अकटरग्राँड (म्युझिक इन द बॅकग्राउंड)’ या चित्रपटातील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून जे अ‍ॅन्टे यांची निवड झाली त्यांना ‘स्लीपर्स वेक’साठी गौरवण्यात आले.


15 भाषांतील चित्रपटांसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध आणखी दृढ करणे, असे इफ्साच्या आयोजनामागील उद्दिष्ट आहे. लघुपटांसाठीदेखील इफ्सामध्ये पुरस्कार देण्यात आले.