आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohanlal's Website Hacked, Pak Supporters Behind Cyber Attack

दाक्षिणात्य अभिनेत्याची वेबसाईट हॅक, 'मुस्लिम आतंकवादी नाहीये'चा मिळाला संदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दाक्षिणात्य अभिनेता मोहनलाल)
दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल वादात अडकले आहेत. त्यांचा खासगी ब्लॉग 'The Complete Actor'वर जम्मू काश्मिर प्रकरणाशी निगडीत काही माहिती मिळाली आहे. या गोष्टीचा त्यांच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना धक्का बसला आहे.
या मॅसेजेसपैकी एक असा, 'आपण हे विसरून चालणार नाही, की मानवताच्या विरुध्द काय झाले आहे. जम्मू आणि काश्मिरमध्ये लाखो लोकांनी आपला जीव गमावला. भारतीय सैन्याने काश्मिरच्या कुटुंबीयांना मारले. चिमुकल्यांचेसुध्दा प्राण घेतले. परंतु त्याची कुणालाच चिंता नाहीयेय. तुमचे बँक खाते, क्रेडीट कार्ड आणि सर्व्हर धोक्यात आले आहे.' या मॅसेजची शेवटची ओळ, 'डिअर एडमिन, आम्ही या मॅसेजला प्रदर्शित करत आहोत. मुस्लिम आतंकवादी नाहीये.'
या अभिनेत्याने मागील काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन केले होते. मात्र, मोहनलाल यांच्या वेबसाइटला काही वेळ हॅक करण्यात आले होते. त्यानंतर वेबसाइटला रि-स्टोर करण्यात आले. 'Team Cyber Warriors' नावाची ही हॅकर टीम असून ती पाकिस्तानला सपोर्ट करते. या हॅकरने अभिनेत्याच्या वेबसाइटला हॅक करून 'Free Kashmir'साठी हे सर्व पोस्ट केले होते.