आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'भट्ट साहेब माझे कृष्ण आहेत, त्यांची शिकवण माझ्या कामी पडते\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहित सूरी
कोणत्याही मोठ्या सिता-यांविना इंडस्ट्रीमध्ये स्थापित होण्या-यांपैकी मोहित सूरी हा एक दिग्दर्शक आहे. आता मोठ-मोठे निर्माते त्याकडून सिनेमा बनवू इच्छितात. 'जहर', 'कलयुग', 'राज'सारख्या सिनेमाच्या माध्यमातून लोकांच्या मनात स्थान निर्माण करणारे महेश आणि मुकेश भट्ट यांच्या भाच्याने 'आशिकी 2'च्या सुपर सक्सेसने सर्वांना आश्चर्यचकित करून सोडले. पहिल्यांदा तो एका नवीन बॅनरसह 'एक व्हिलेन' या गंभीर प्रेमकथेसह लोकांच्या भेटीस येत आहे. हा सिनेमा 27 जून रोजी रिलीज होणार आहे.
यानिमित्त मोहित सूरीने आमच्या बातचीत केली त्याचे काही अंश...
पहिल्यांदा भट्ट कॅम्पच्या बाहेर सिनेमा बनवत आहेस...
मुलगा जेव्हा सायकल चालवतो तेव्हा वडील मागे पकडून आधार देतात. परंतु एके दिवशी त्यांना तो आधार काढून घ्यावाच लागतो. सर्वांच्या आयुष्यात असे वळण येते. एकताचे 'आशिकी 2' हिट झाल्यानंतर नव्हे तर 'क्रुक'पासून सिनेमाचे प्लानिंग ठरलेले होते. सिनेमा बनवणे निश्चित होते मात्र त्याची पटकथा आम्हाला पसंत येईल अशी नव्हती. 'एक व्हिलेन'ची कहानी लिहिण्यास आम्ही 'आशिकी 2'पूर्वीच सुरू केली होती. मला नवोदित स्टार्ससह सिनेमा बनवण्यास पाठिंबा देणा-या लोकांपैकी एकता एक आहे.
भट्ट कॅम्पकडून क्रिएटीव्ह सपोर्ट खूप मिळत राहिला...
हो, ते केवळ निर्माते नाहीत. मुकेश यांचे संगीतामधील ज्ञान आणि महेश यांचे क्रिएटीव्ह इनपुट नेहमी असते. परंतु महेश भट्ट व्यक्तीत्व निखरण्यात जास्त मदत करतात. मला आई-वडील नाहीत. ते मला माझ्या पालकांप्रमाणे आहेत. मी जो विचार करतो तेच मी बनवतो. भट्ट यांनी दिलेली शिकवण माझ्या खूप कामात येत. ते माझ्यासाठी कृष्ण आहेत. त्यांनी मला युध्द करण्यास नाही शिकवले. त्यांनी मला संगीतातील सार समजावले. 'आवारापन'पासूनच त्यांचा माझ्यावर विश्वास बसला होता. 'मर्डर 2'पासून त्यांनी माझ्या सायकलचा आधार सोडला होता. मी आजही त्यांवर अवलंबून आहे मात्र भावनात्मक रुपात. जेव्हा निराश होतो तेव्हा त्यांच्याशी बोलतो. काही दिवसांपूर्वी त्यांना भेटण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी माझा हात पकडला त्यावेळी जाणवले ते आजही माझ्यासोबत उभे आहेत.
पूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...