(स्माइली सूरी आणि विनीत बंगेरा)
'एक व्हिलन' या सिनेमाचा दिग्दर्शक मोहित सूरी सध्या खूप आनंदात आहे. त्याच्या आनंदाचे पहिले कारण म्हणजे त्याच्या सिनेमाचे सर्वत्र कौतूक होत आहे, तर दुसरे कारण म्हणजे त्याची लाडकी बहीण स्माइली सूरी अलीकडेच लग्नगाठीत अडकली. 'कलयूग' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या स्माइलीचे तिचा डान्स टीचर विनीत बंगेरासोबत लग्न झाले. बुधवारी हा लग्नसोहळा पार पडला. मोहितच्या बहिणीचा हा लग्नसोहळा खूप खासगी होती, यामध्ये बॉलिवूडमधून कुणीही सहभागी झाले नव्हते.
यापूर्वी 31 मार्च 2014 रोजी स्माइली आणि विनीत यांचा साखरपूडा झाला होता. विनीत आणि स्माइलीची भेट एका डान्स क्लासमध्ये झाली होती. तेथे विनीत स्माइलीला डान्स शिकवायचा. गेल्यावर्षी दीवाळीत विनीतने रिंग देऊन स्माइलीला प्रपोज केले होते. या नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी स्माइलीचे मामा आणि निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट आवर्जुन हजर होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्माइली आणि विनीतच्या लग्नाची निवडक छायाचित्रे...