फाईल फोटो: प्रिती झिंटा आणि राणी मुखर्जी
मुंबई: अभिनेत्री राणी मुखर्जीने प्रितीला सर्वात धीट महिला म्हणून सांगितले आहे. अलीकडेच, तिने तिच्या 'मर्दानी' सिनेमा ट्रेलर लाँच केला. या इव्हेंटमध्ये माध्यामांनी तिला प्रिती झिंटाच्या छेडछाड प्रकरणाविषयी विचारले असता, तिने सांगितले, की प्रिती एक धाडसी महिला असून ती तिच्यासोबत आहे. तिने प्रकरणाविषयी अलेही सांगितले, की या विषयावर बोलण्यासाठी हे ठिकाण योग्य नाहीये.
राणीने असेही म्हणाली, 'प्रिती एक चांगली व्यक्ती आहे. आम्ही चार सिनेमे एकत्र केलेत. 'पिया पिया' गाण्यावर डान्सदेखील केला आहे. एवढेच नाही तर, ती मला म्हणाली होती, की आपण एकाच मंडपात लग्न करू. परंतु मी तिच्या आधी लग्न करू तिला हरवले.'
राणी आणि प्रिती एकमेकींच्या जिवलग मैत्रीणी आहेत. त्यांनी 'हर दिल जो प्यार करेगा' (2000), 'चोरी-चोरी चुपके-चुपके'(2001), 'कभी अलविदा न कहना'(2006) आणि 'वीर झारा'(2004)मध्ये केले आहे.
नावात चोप्रा लावणार नाही लावणार राणी
'मर्दानी'च्या ट्रेलर लाँचिंगदरम्यान राणीने सांगितले, की ती आपल्या नावापुढे चोप्रा लावणार नाहीये. पती आदित्यची इच्छा आहे, की ती मुखर्जी नावानेच ओळखली जावी. यावेळी तिने माध्यमांसमोर सांगितले, 'मला माझे नाव प्रिय आहे. मी नेहमी राणी मुखर्जीच राहणार आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा राणी मुखर्जी आणि प्रिती झिंटा यांची मैत्री दर्शवणारी आणखी 9 छायाचित्रे...ती पाहून तुम्हीच अंदाजा लावू शकता राणी-प्रिती किती जिवलग मैत्रीणी आहेत...
नोट: सर्व छायाचित्रे इंटरनेटच्या विविध माध्यमांतून घेण्यात आली आहेत...