आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MONSOON SPL : Actress Juhi Gadaki Sharing Her Experiance

MONSOON SPL: जुई गडकरीला पाऊस एन्जॉय करायला आवडतो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाऊस म्हणजे ओला पदर... पाऊस म्हणजे दरवळ... पाऊस म्हणजे गार वारा... पाऊस म्हणजे हिरवळ... पाऊस म्हणजे पहिलं प्रेम... अशा एकापेक्षा एक सरस उपमा वेड्या पावसाला दिल्या जातात. कारण पाऊस असतोच तसा, अगदी स्पेशल. पाऊस हा एक वेगळा, भन्नाट अनुभव घेऊन येतो. काहींना त्याचा अनावर राग येतो तर काहींना तो फार हवाहवासा वाटतो... मराठी कलाकारांसाठीही पाऊस काहीसा स्पेशल असतो. त्यांना पाऊस मनापासून आवडतो. तळहातावर पावसाचे थेंब झेलण्याचं, पावसाचा गारवा मनात साठविण्याचं आणि पावसाच्या धारांमध्ये मनसोक्त भिजण्याचं त्यांनाही अफलातून वेड असतं...

आजपासून दर सोमवारी आणि बुधवारी छोट्या, मोठ्या पडद्यावरील मराठी कलाकार दिव्य मराठी डॉट कॉमच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहेत. अर्थात यावेळी आपल्या सोबत असेल सर्वांना हवाहवासा असलेला... वेडावून टाकणारा चावट पाऊस...

या सदरातील पहिल्या भागात 'पुढचं पाऊल' या मालिकेद्वारे घराघरांत पोहचलेली कल्याणी अर्थातच जुई गडकरी आपल्या भेटीला येत आहे.