आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मस्ती 3' आणि 'हेट स्टोरीज2'सह पडद्यावर अवतरणार 'A' सर्टिफिकेट सिनेमे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ए सर्टिफिकेट प्राप्त सिनेमे छोट्या पडद्यावर प्रसारित होणार की नाही, यावर अद्याप सरकारने निर्णय घेतलेला नाही. मात्र बॉलिवूडमध्ये वयस्क सिनेमांचा नवीन ट्रेंड सेट होताना दिसतोय. 2014-15 मध्ये अनेक वयस्क सिनेमे आणि इतर सिनेमांचे सिक्वेल तयार होणार आहेत. या सिनेमांना ए सर्टिफिकेट मिळण्याची चिंता निर्माते करत नाहीयेत.
सॅटेलाइट नियमांमध्ये बदलांची चिंता सोडून निर्माते आता भारतीय प्रेक्षकांवर आपले लक्ष केंद्रित करत आहेत. सॅटेलाइट नियमांमध्ये बदल झाल्यास ए सर्टिफिकेट प्राप्त सिनेमे रात्री अकरा वाजेनंतर टीव्हीवर प्रसारित करण्यात येतील. त्यामुळे निर्मात्यांना काही कोटींचा फायदा होण्याची शक्यता आहे.
6 कोटींमध्ये तयार झालेला 'मस्तराम' सिनेमाला रिलीजपूर्वीच मागणी आहे. प्रेक्षकांची बदलत चाललेली आवड बघता निर्मात्यांनी आता सॅटेलाइट रिकव्हरीकडे लक्ष न देता वयस्क कॉमेडी आणि हॉरर धाटणीचे सिनेमे बनवण्याकडे आपला कल वाढला आहे.
एकता कपूर ‘रागिनी एमएमएस-3’च्या तयारीला लागली आहे, तर दुसरीकडे ‘मस्ती’ आणि ‘ग्रॅण्ड मस्ती’चे निर्माते ‘मस्ती-3’वर काम करत आहेत. याशिवाय ‘बीए पास’चे दिग्दर्शक अजय बहल इरॉटिक थ्रिलरच्या प्री प्रॉडक्शनमध्ये बिझी आहेत. विक्रम भट्टदेखील ‘हेट स्टोरीज’ चा दुसरा भाग ‘हेट स्टोरीज-2’ लवकरच रिलीज करणार आहेत.
ट्रेड पंडितांनुसार, इरॉटिक सिनेमे आणि अॅडल्ट कॉमेडीला आता मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रिनवर पसंत केले जात आहेत. तर निर्मातेसुद्धा ए सर्टिफिकेटची चिंता न करता खास प्रेक्षकवर्गाला असे सिनेमे बघण्यास आमंत्रित करत आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या अलीकडेच रिलीज झालेल्या ए सर्टिफिकेट सिनेमांच्या कमाईविषयी...