आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • More Then One Million People Saw The Trailer Of Hate Story 2

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

3 आठवड्यात एक कोटींपेक्षा जास्त लोकांनी बघितला 'हेट स्टोरी 2'चा ट्रेलर, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हेट स्टोरी 2'चा ट्रेलर पाहण्यासाठी वर क्लिक करा...
मुंबई: 'हेट स्टोरी 2' ट्रेलरने व्ह्यूव्हरशिपच्या बाबतीत नवीन उच्चांक गाठला आहे. 2 जून 2014 रोजी यू-ट्यूबर आलेला 'हेट स्टोरी 2'चा ट्रेलर आतापर्यंत एक कोटींपेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे. 'हेट स्टोरी 2' सिनेमा 2012मध्ये आलेल्या 'हेट स्टोरी'चा सीक्वल आहे. त्यामध्ये पाउली डॅम आणि गुलशन देवैयाने मुख्य भूमिका साकारली होती. हा सिनेमा बोल्ड सीन्सने बराच चर्चेत आला आहे.
'हेट स्टोरी 2'मध्ये सुरवीन चावला, जय भानूशाली आणि सुशांत सिंह यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाला विशाल पांड्याने दिग्दर्शित केले आहे. सिनेमा संकल्पनेच्या जोरावर सुरूवातीपासूनच चर्चेत होता. सिनेमाच्या काही बोल्ड सीन्स आणि गाण्यांवर सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली. सिनेमा निर्मात्याने यातील काही बोल्ड सीन्स काढून टाकले असले तरी सिनेमाचा प्रोमो खूप बोल्ड आहे.
जय भानूशाली या सिनेमामधून बॉलिवूड करिअरला सुरूवात करत आहे. सुरवीनने यापूर्वी 2011मध्ये 'हम तुम शबाना' (कॅमियो), 2012मध्ये 'हिम्मतवाला' (स्पेशल अपियरन्स)मध्ये दिसली होती. मुख्य अभिनेत्री म्हणून सुरवीनचा हा पहिला सिनेमा आहे. सिनेमाच्या या दोन्ही मुख्य स्टार्सनी टीव्ही जगात बरेच नाव कमावले आहे. जयने एकता कपूरच्या 'कयामत' शोमध्ये मुख्य भूमिका साकारली होती.
तसेच, सुरवीनने एकता कपूरच्या 'कही तो होगी', 'कसौटी जिंदगी की' आणि 'काजल' या मालिकांमध्ये मुख्य भूमिका वठवली होती. सुरवीन मालिकाच नव्हे तर 'एक खिलाडी एक हसीना' आणि 'कॉमेडी सर्कस' या कॉमेडी शोचे होस्टिंग केले होते. 2011मध्ये आलेल्या 'धरती' या पंजाबी सिनेमामध्ये मोठ्या पडद्यावर झळकली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा 'हेट स्टोरी 2'च्या ट्रेलरमधून घेतलेली 10 निवडक छायाचित्रे...