आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बी टाऊनच्या सेलिब्रिटींची अशी चित्रविचित्र छायाचित्रे तुम्ही यापूर्वी पाहिली आहेत का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सलमान खान, रेखा आणि आमिर खानची जुनी छायाचित्रे)
फोटो क्लिक करण्यासाठी हटके पोज देणे, ही बी टाऊनच्या सेलिब्रिटींसाठी सामान्य बाब आहे. मात्र अनेकदा या सेलेब्सची अशी काही छायाचित्रे समोर येतात, जी बघणे कदाचित त्यांचे चाहते पसंत करणार नाहीत.
गोविंदाचे असेच एक छायाचित्र इंटरनेटवर उपलब्ध आहे. यामध्ये तो शर्टलेस दिसतोय. गोविंदाला शर्टलेस कदाचितच कधी त्याच्या चाहत्यांनी बघितले असावे. खरं तर सलमान खानला अनेकदा शर्टलेस बघितले गेले आहे, मात्र गोविंदाला नाही.
1990च्या दशकात करिश्मा कपूर आणि रविना टंडन या अभिनेत्रींसोबत यशस्वी जोडी बनवणारा गोविंदा लवकरच सिनेमांमध्ये कमबॅक करत आहे. 'किल दिल' हा त्याचा सिनेमा नोव्हेंबर महिन्यात बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.
गोविंदा बी टाऊनमधील फिटनेसमध्ये मागे असलेला अभिनेता आहे. त्याच्या सोबतचे हीरो शाहरुख, सलमान आणि आमिर आजही तरुण दिसतात, तर गोविंदा आपल्या वयापेक्षा बराच मोठा दिसतो. खरं तर करिअरच्या सुरुवातीच्या काळात तो फिट होता. मात्र आज परिस्थिती काहीशी वेगळी आहे.
असो, वरील छायाचित्रात एकीकडे गोविंदा शर्टलेस दिसतोय, तर त्याच्या शेजारच्या छायाचित्रात असलेल्या सलमान खान आणि आमिर खान यांना ओळखणे कठीण आहे. पडद्यावर हे स्टार्स असा काही चित्रविचित्र अवतार करतात, की ते पाहून त्यांचे चाहते अचंबित तरी होतात, किंवा त्यांना हसू आवरणे तरी कठीण होतं.
आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला शक्ति कपूर, शिल्पा शेट्टी, हेमामालिनी, श्रीदेवी, यासह आणखी काही स्टार्सची अशीच काही चित्रविचित्र छायाचित्रे दाखवत आहोत. विशेषतः शक्ति कपूर आपली ही छायाचित्रे पाहून नक्कीच लाजिरवाणा होईल.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्टार्सची छायाचित्रे...