आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीरच्या अ‍ॅडने उडवली खळबळ, यासुध्दा आहेत सर्वात वादग्रस्त आणि अश्लिल जाहिराती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा नवीन स्टाइल आयकॉन रणवीर सिंहने अलीकडेच, एक कंडोमसाठी 'डू द रिक्स' जाहिरात शुट केली आहे. सध्या रणवीर इंडस्ट्रीमधील सर्वात जास्त मागणी असलेला अभिनेता आहे. इतर आघाडीचे स्टार्स हेल्थ ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्ससारख्या जाहिराती करतात, परंतु रणवीरने अशी जाहिरात निवडून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
बॉलिवूडमध्ये बोल्ड अभिनेत्याची प्रतिमा निर्माण करणा-या रणवीरचे म्हणणे आहे, की तो ही जाहिरात करून आनंदी आहे. देशातील तरुणाईला याच्या प्रति जागरुक करण्याची सध्या गरज आहे. पुढेही तो या कंपनीसोबत काम करू इच्छितो. त्याला ही जाहिरात करण्यास कोणतीही अडचण नाहीये. तो पहिला बॉलिवूड अभिनेता आहे जो अशा जाहिरातीत झळकत आहे.
नेहमीच काहीतरी वेगळे करण्यासाठी सवयीने ओळखला जाणारा रणवीर म्हणतो, की सुरक्षित शरीरिक संबंधाचा प्रचार करण्यात काय वाईट आहे.
एका आठवड्यापूर्वी रिलीज झालेल्या या जाहिरातीला पहिल्या दिवशी जवळपास 2 लाख लोकांनी बघितले आहेत. लोक सोशल साइट्सवर या जाहिरातीला मोठ्या प्रमाणात शेअरदेखील करत आहे. जाहिरातीत रणवीर सुरक्षित शरीरिक संबंधाविषयी जागृकता करत असताना रॅप डान्स करतानासुध्दा दिसत आहे. ही ड्यूरेक्स कंडोमची जाहिरात आहे. त्याचे नाव लव्हर्स ऑल द ओव्हर वर्ल्ड, लेट्स डू द रिक्स' आहे.
जेव्हा रणवीरने या जाहिरातीसाठी होकार दिला होता तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आपल्या चार वर्षांच्या करिअरमध्ये रणवीरने नेहमीच काहीतरी वेगळे करून प्रत्येकाला धक्का दिला आहे. रणवीरचटी ही जाहिरात वादात अडकली नाही हे विशेष. परंतु त्याची जोरदार चर्चा मात्र सुरू आहे. यापूर्वीच्या अनेक जाहिराती अशा ज्या वादात अडकलेल्या आहेत. त्यांचा संकल्प आणि शुट इतके भडक होते, की त्यांच्यावर बंदी घालावी लागली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा सर्वात जास्त वादात अडकलेल्या जाहिरातींविषयी...