आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल 209 कोटींचा आहे सलमानचा बंगला, जाणून घ्या सेलेब्सच्या महागड्या घरांविषयी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आपल्या 'गॅलेक्सी' या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरुन चाहत्यांना अभिवादन करताना सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान)
मुंबई - बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांचा मुंबईतील ‘आशीर्वाद’ बंगला एका उद्योगपतीने 90 कोटी रुपयांना विकत घेतल्याची चर्चा आहे. कार्टर रोड येथील समुद्रकिनारी असलेला खन्ना यांचा हा बंगला ऑलकार्गा लॉजिस्टिक्सचे कार्यकारी संचालक शशी किरण शेट्टी यांनी विकत घेतला असल्याचे वृत्त आहे. या बंगल्याच्या विक्रीतून खन्ना कुटुंबीयांना 90 कोटी रुपये मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, याबाबत शेट्टी यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडिया यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर हा लॅव्हिश बंगला खरेदी केला होता. पूर्वी राजेंद्र कुमार यांनी खरेदी केला होता आणि त्याचे नाव 'डिंपल' असे होते. मात्र राजेंद्र कुमार यांच्यासाठी हा बंगला अशुभ ठरला. त्यांचे एकामागून एक सिनेमे अयशस्वी ठरु लागले होते. त्यामुळे त्यांनी हा बंगला विकला आणि तो राजेश खन्ना यांनी खरेदी केला. त्यांनी त्याचे नाव बदलून 'आशीर्वाद' असे ठेवले. या बंगल्यात आल्यानंतर राजेश खन्ना यांनी नमक हराम, रोटी यांसारखे एकामागून एक 15 हिट सिनेमे दिले. हा बंगला त्यांच्यासाठी खूप लकी सिद्ध झाला होता. या बंगल्यावर राजेश खन्ना यांचे इतके प्रेम होते की मोठमोठ्या बिल्डर्सना त्यांनी हा बंगला विकायला अनेकदा नकार दिला होता.

तसं पाहता स्वतःचे एक आलिशान घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. जर सेलिब्रिटींविषयी बोलायचे झाल्यास ते आपले हे स्वप्न पूर्ण करण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवत नाहीत. त्यांच्या महागड्या बंगल्यांवर प्रत्येकांच्या नजरा खिळतात. बी टाऊनमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांचे घर केवळ मुंबईतच नव्हे तर परदेशातसुद्धा आहे. त्यांच्या एकेका बंगल्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.
एक नजर टाकुया बी टाऊन स्टार्सच्या अशाच काही महागड्या बंगल्यांवर...
स्टार : सलमान खान
बंगल्याचे नाव : गॅलेक्सी
स्थळ : मुंबई
किंमत : जवळजवळ 209 कोटी रुपये
नोट : सलमान खानचा गॅलेक्सी हा बंगला स्टार्सच्या प्रसिद्ध बंगल्यांपैकी एक आहे. दर आठवड्याच्या शेवटी सलमान खानच्या चाहत्यांच्या गर्दीमुळे या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतं. सलमान दररोज आपल्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरुन आपल्या चाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करत असतो.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अमिताभ बच्चन, आमिर खान, शिल्पा शेट्टी आणि शाहरुख खान यांच्या बंगल्यांच्या किंमती...