आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कॉकटेल'ची चव न चाखलेलीच बरी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरोनिका (दीपिका पदुकोण) आणि मीरा (डायना पेंटी) या दोघींची भेट मध्यरात्री कॉफीशॉपच्या वॉशरुममध्ये होते. दोघींपैकी एक उदास आहे तर दुसरी नशेत धुंद आहे. नशेत धुंद असेलेली युवती डिप्रेस मुलीला आपल्या घरी घेऊन येते. यापैकी मद्यधुंद असलेली तरुणी म्हणजे वेरोनिका (दीपिका) आहे, उदास आणि डिप्रेस झालेली मीरा आहे. या दोघींमध्ये चांगली मैत्री होते. तसं पाहता वेरोनिकाला मित्र नसतात. सती सावित्रीची इमेज असलेली मीरा वेरोनिकाची बेस्ट फ्रेंड बनते. इतकेच नाही तर मीरा वेरोनिकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनते आणि वेरोनिकाच्या फ्लॅटवरच राहू लागते.
गौतम (सैफ अली खान) मीराचा मित्र असतो. गौतम, वेरोनिका, मीरा या तिघांचा लव्ह ट्रँगल या चित्रपटात आहे. दोन मुली आणि एक मुलगा असा हा टिपिकल हिन्दी चित्रपटांमधला लव्ह ट्रँगल आहे.
मुलाचे एका मुलीवर प्रेम आहे. ती मुलगीही अद्याप सिंगल आहे. मात्र दुस-या मुलीचेही त्या मुलावर प्रेम आहे. या प्रेमाच्या त्रिकोणात कोण कुणाला भेटणार किंवा त्या दुस-या मुलीचे काय होणार याचा आपल्याला विसर पडतो. बहुदा चित्रपट निर्मात्यांनाही हा विसर पडलेला दिसतो. हा एक बिग बजेट सिनेमा करण्याकडेच दिग्दर्शकाचे लक्ष लागलेले दिसते.
जब वुई मेट आणि रॉकस्टार या चित्रपटांचे दिग्दर्शक इम्तियाज अलीने या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर प्रीतमचे संगीत आहे. या चित्रपटातले 'तुम्ही हो बंधू...' हे गाणे बरेच गाजत आहे. अली लोहारच्या गाजलेल्या जुगनी या गाण्याचा वापर चित्रपटात साऊंडट्रॅक म्हणून केला आहे. लंडनच्या नयनरम्य लोकेशन्सबरोबर साऊथ आफ्रिकेच्या केप टाऊनमध्येही चित्रपटाचे शुटिंग करण्यात आले आहे.
या ठिकाणी गौतमची आई (डिंपल कपाडिया) गौतमला एका मुलीला किस करतांना बघते. गौतम मीराला किस करतोय असे तिला वाटते. मात्र गौतम वेरोनिकाला किस करत असतो. त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण होते की, गौतमची आई वेरोनिकाचे किस घेते. हे दृश्य पाहून आपण पोटधरुन हसतो.
एजेंट विनोद, आरक्षण, कुर्बान या चित्रपटांना विसरुन या चित्रपटातला सैफचा अभिनय बघा. सैफ यापेक्षाही चांगले चित्रपट नक्कीच करु शकतो.
(लेखक हे प्रख्यात चित्रपट समीक्षक आहेत)
'दीपिकऐवजी करीनाला घेतले असते तर कुणीच 'कॉकटेल' बघितला नसता'
PICS: 'कॉकटेल' पार्टीत बॅकलेस ड्रेसमध्ये पोहोचली दीपिका
लव्ह ट्रँगलचे 'कॉकटेल'