आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजोडी ब्रेकर्सही लग्न तोडणा-या सिद (आर. माधवन) आणि सोनाली (बिपाशा बासू) यांची प्रेमकहाणी आहे. बायकोपासून दुरावल्यानंतर सिदचा लग्नसंस्थेवरुन विश्वासच उडतो. नैनोच्या (ओमी वैद्य) पबमध्ये सिदची भेट सोनालीशी होते. त्यानंतर हे दोघे जोडी ब्रेकरच्या बिझनेसमध्ये पार्टनर होतात. यानंतर या दोघांच्या आयुष्यात काय चढउतार येतात, ते एकमेकांच्या प्रेमात कसे पडतात आणि हे दोघे रुळावरुन घसरलेली आपल्या आयुष्याची गाडी कशी पुन्हा रुळावर आणतात, हाच या सिनेमाचा क्लायमॅक्स आहे.
स्टोरी ट्रिटमेंट - जोडी ब्रेकर्सची कथा दमदार आहे. कथा लोकांना खिळवून ठेवणारी आहे. इंटरवलपर्यंतचा सस्पेन्स प्रेक्षकांना आपलासा करुन ठेवतो, मात्र सिनेमाचा सेकंड हाफमध्ये प्रेक्षकांची निराशा होते.
दिग्दर्शन - 'गुड बॉय बॅड बॉय'नंतर दिग्दर्शक अश्विनी चौधरी 'जोडी ब्रेकर्स'च्या रुपात एक जबरदस्त फिल्म घेऊन आले आहेत. अश्विनीचा प्रयत्न चांगला आहे, मात्र सिनेमा जसजसा पुढे सरकतो तसं तसा सिनेमा दिग्दर्शकाच्या हातून सुटत जात असल्याचं भासतं. एडिटींग आणि सिनेमॅटोग्राफीमध्ये ते स्पष्टच जाणवतं. संगीत/डायलॉग्स/सिनेमॅटोग्राफी/एडिटींग/ -
सिनेमाचं संगीत लक्षात राहणार नाही आहे. संवाद दमदार आहेत, सिच्युएशननुसार साजेसे संवाद आहेत. मात्र कॅमेरावर्कवर जास्त लक्ष देण्यात आलं नसल्याचं समजतं. एडिटींगवरही जास्त मेहनत घ्यायला हवी होती असं सिनेमा बघतांना जाणवतं.
सिनेमा का पाहावा - बिपाशा आणि माधवन यांची केमिस्ट्री चांगली रंगली आहे. या दोघांच्या परफॉर्मन्ससाठी थिएटरमध्ये जाऊन एकदा सिनेमा बघायला हरकत नाही.
विल्स फॅशन वीकमध्ये 'जोडी ब्रेकर्स'चा जलवा (फोटो फिचर)
वेगळा विषय घेऊन येत आहे 'जोडी ब्रेकर्स'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.