आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MSG Screening: Fans Converge In Gurgaon Amid Protests

MSGचा प्रीमिअर थांबवला, पंजाबमध्ये पोस्टर फाडल्याने दगडफेक, 18 जानेवारीला होईल रिलिज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- हिस्सारमध्ये गुरमीत राम रहीम यांचा चित्रपट MSG ला विरोध दर्शवताना लोक)

गुडगांव/दिल्ली- डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांचा 'MSG-मेसेंजर ऑफ गॉड' हा चित्रपट रिलिज होण्याआधीच वादग्रस्त ठरला आहे. हरियाणात या चित्रपटाला कडाडून विरोध करण्‍यात आला आहे. त्यामुळे MSG आज शुक्रवार (16 जानेवारी) ऐवजी 18 जानेवारीला रिलिज होणार आहे. पंजाबमध्ये चित्रपटाचे पोस्टर फाडल्यावरून दगडफेक करण्‍यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.

दुसरीकडे, 'MSG-मेसेंजर ऑफ गॉड' ला चित्रपट प्रणाणपत्र नामांकन लवादाकडून मंजुरी मिळाल्याने चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे चित्रपट सेंसॉर बोर्डाच्या अध्यक्षा लीला सॅमसन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी सेंसॉर बोर्डाने या चित्रपटाला परवानगी नाकारली होती.

गुडगाव येथील लेझर व्हॅली ग्राउंडवर MSG प्रदर्शित होण्यापूर्वी आज (शुक्रवार) प्रीमिअर आयोजित करण्‍यात आले होते. मात्र, ऐन वेळी हा कार्यक्रम थांबवण्यात आल्याची माहिती मिळा ली आहे. यादरम्यान, हरियाणात MSG ला विरोध करण्‍यात येत आहे. आयएनएलडीने हिसार आणि गुडगावमध्ये गुरमीत राम रहीम यांचा प्रत‍िकात्मक पुतळ्याचे दहन केले. या पार्श्वभूमीवर पंजाबमधील अमृतसरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, स्वतःला 'देव' दाखवण्यावरुन घालण्यात आली होती, MSG वर बंदी